५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Tuesday, 13 April 2021


 नाईल : आफ्रिका खंडातील ही प्रमुख नदी असून जगातील सर्वात लांब नदी आहे.या नदीची लांबी ६६५० किलोमीटर असून ४१३० मैल इतका लांब प्रवास करत आहे.पांढरी नाईल व निळी नाईल या दोन प्रमुख तिच्या उपनद्या असून पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो,तर निळ्या नाईलचा उगम इथियोपिया मधील ताना सरोवरात होतो .सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होत असून तेथून पुढे नाईल नदी उत्तरेकडे वाटचाल करत भूमध्य समुद्रास मिळते. 

अॅॅमेझॉन : दक्षिण अमेरिका खंडातील ही प्रमुख नदी असून जगातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे.मात्र पाण्याच्या घनतेचा विचार केला तर हिचा जगात पहिला क्रमांक लागतो .पाण्याचा विसर्ग सुमारे २ लाख घनमीटर प्रती सेकंद एवढा आहे. या नदीचा उगम पेरू देशातील अँँन्डीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे.ती उत्तर अटलांटिक महासागरास मिळते. 

No comments:

Post a Comment

Write a comment.