काळ(Tense):
प्रत्येक वाक्यातील क्रियापादावरून
आपल्याला क्रियेचा बोध होतो. त्याच प्रमाणे ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, घडली आहे अथवा पुढे घडणार आहे याचाही बोध होतो. त्या बोध होण्यासच त्या
वाक्यातील काळ असे म्हणतात.
कर्त्याने केलेल्या
कार्याची वेळ दाखवणाऱ्या शब्दास क्रियेचा ‘काळ’ असे म्हणतात .
काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
१) वर्तमान काळ (Present
Tense): क्रिया आता घडते. उदा:- मी काम करतो.
२) भूतकाळ (Past
Tense): क्रिया पूर्वी घडली. उदा:- मी काम केले.
३) भविष्यकाळ ( Future
Tense): क्रिया पुढील काळात घडली. उदा:मी काम करीन.
क्रियापदाच्या रूपावरून
क्रिया आता घडते असे जेव्हा समजते,तेव्हा तो
वर्तमानकाळ असतो. उदा.मी लेखन करतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी
घडली असे जेव्हा कळते ,तेव्हा तो भूतकाळकाळ असतो. उदा.मी लेखन केले .
क्रियापदाच्या रूपावरून
क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते ,तेव्हा तो भविष्यकाळ असतो. उदा.मी लेखन करेन .
या शिवाय प्रत्येक काळाचे
तीन मुख्य उपप्रकार आहेत.
१) वर्तमान काळ(Present Tense):
(१) साधा वर्तमान काळ(Simple Present Tense)
: उदा. मी निबंध लिहितो.
(२) अपूर्ण वर्तमान काळ(Presnt Progressive
Tense): उदा. मी निबंध लिहित आहे.
(३)पूर्ण वर्तमान काळ(Present
Perfect Tense):
उदा. मी निबंध लिहिला आहे.
२) भूतकाळ(Past
Tense)
(१) साधा भूतकाळ(Simple Past Tense): उदा. मी निबंध लिहीन.
(२) अपूर्ण भूतकाळ(Past
Progressive Tense): उदा. मी निबंध लिहीत होतो.
(३)पूर्ण भूतकाळ(Past
Perfect Tense): उदा. मी निबंध लिहीला होता.
३) भविष्यकाळ(Future
Tense):
(१) साधा भविष्यकाळ(Simple
Future Tense): उदा. मी निबंध लिहीन.
(२) अपूर्ण भविष्यकाळ(Future Progressive
Tense): उदा. मी निबंध लिहीत असेन.
(३)पूर्ण भविष्यकाळ(Perfect
Future Tense): उदा. मी निबंध लिहीला असेल.
No comments:
Post a Comment
Write a comment.