५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Tuesday, 13 July 2021

पोशिंदा

 

       * पोशिंदा *


दगड-धोंड्याच्या माळरानात  

कुळवाच्या चार मारून  रेघोट्या

वाट पाहिली मिरगाच्या सरीची

पण तिनं मारल्या कोलांटया  


      वाळक्या मातीत बी पेरून  

      सपान उद्याच्या भाकरीचं पाह्यलं

            मध्येच मारली दडी पावसानं

            पीक शेतात करपून राह्यलं


त्याच हे सोनेरी सपान

कष्ट करूनही भंगलं मातीत

त्याच्या घामाच्या धाराचा

लिलाव मांडला निष्ठूर जातीत 


भुकेलेल्या पोरा पाहून

काळीज मायेन दाटल

अंधारून आल सार

थेंब डोळ्यात आटलं


वाळवून करवंटी त्यान

भार साऱ्यांचा सोसला

कर्जापायी त्याचा जीव

सावकाराच्या फासात फसला


उभ्या जगाचा पोशिंदा

साऱ्या दुनयेवर रुसला

साऱ्या दुनयेवर रुसला

No comments:

Post a Comment

Write a comment.