दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका; मंडळाकडून नियोजन पूर्ण
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (ssc result) 16 जुलै रोजी जाहीर केला होता, त्या निकालानंतर आता मंडळाकडून (education board) तब्बल 24 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना (students) आपल्या हातात गुणपत्रीका पडणार आहेत. या गुणपत्रिका वितरित (ssc marksheets) करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आज मंडळाकडून देण्यात आली. ( ssc students will get marksheets on ninth augast-nss9)दहावीची विद्यार्थ्यांना येत्या 9 ऑगस्टला शाळांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. शाळांनी कोरोनासंबंधित राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या सोईनुसार गुणपत्रिका वितरीत कराव्यात अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.
काही कारणास्तव विद्यार्थ्यांचा निकाल न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांबाबत शाळांनी लेखी स्वरूपात तातडीने विभागीय ़शिक्षण मंडळाकडे संपर्क साधावा, असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळ सचिव राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका नेण्यासाठी शाळांकडे ठराविक तारखेचा आग्रह धरू नये, अशा सूचनाही अहिरे यांनी दिल्या आहेत.राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत असलेल्या 22 हजार 767 शाळांतून एकुण 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी पास झाले आहेत, निकाल जाहीर झाल्यानंतर या लाखोना आपली मूळ गुणपत्रिका केव्हा मिळेल यासाठीची प्रतीक्षा लागली होती. मात्र दहावीच्या निकालानंतर मंडळातील विविध कामकाजाच्या दिरंगाईमुळे आता तब्बल 24 दिवसानंतर या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत
E132409
ReplyDeleteF132409
ReplyDelete