CET : वाद न्यायालयात ! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर,
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी (eleventh Admission) आयोजित केलेल्या सीईटीचा (CET) वाद न्यायालयात (court) पोहोचल्याने राज्यभरात ही सीईटी अडचणीत सापडली आहे. केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश या सीईटीत करण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिल्याने सरकारची (government) मोठी अडचण होणार असून यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (online admission) लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( eleventh CET in problems online Admission may go on waiting -nss91)तर दुसरीकडे न्यायालयात केंद्रीय मंडळांच्या पालक आणि इतर संघटनांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याने या दरम्यान सुरू असलेली सीईटीची नोंदणी अडचणीत येईल की काय अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आह. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि त्यानंतर मागील आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
Nice
ReplyDelete