५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Saturday, 28 August 2021

शब्दांच्या जाती व प्रकार parts of speech

 

शब्दांच्या जाती ( parts of speech)

शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय.प्रत्येक शब्दांचे वाक्यात  कार्ये विविध प्रकारची असतात .अशा शब्दांच्या वाक्यातील कार्या वरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे.त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.


                                                    शब्दांचे प्रकार


 विकारी(सव्यय) शब्द                  २    .अविकारी(अव्यय) शब्द 








विकारी शब्द :            नाम, सर्वनामविशेषण व क्रियापद या चार प्रकारच्या शब्दांच्या जातीत. लिंगवचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होतात म्हणून व्याकरणात त्यांना विकारी शब्द(सव्यय) असे म्हणतात.

उदा.: सभ्य स्त्री-पुरुषहोमाझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.

       या परिच्छेदात स्त्री’, ‘पुरुष’, ‘विद्यालय’, ‘कार्यक्रम’, ‘चरणी’, आनंद’, यासारखी नामे’ आली आहेत. माझ्या’, ‘हा’, ‘मला’, ‘आपल्या’, यासारखीसर्वनामे’, आली आहेत. सभ्य’, ‘जाहीर’, इ. विशेषणे आली आहेत आणि आहे’ हे क्रियापद आहे.

अविकारी शब्द :            क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्ययउभयान्वयी अव्ययकेवलप्रयोगी अव्यय या चार प्रकारच्या शाब्दांच्या जातीत लिंगवचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होत नाहीम्हणून त्यांना ‘अविकारी शब्द (अव्यय)’ असे म्हणतात.

उदा. १) आजी गटागटा औषध पिते आणि साखर खाते.

     २) अरेरे! आजीला झाले तरी काय? 

     ३) आजीपासून आनंद घ्यायचा व तो इतरांना वाटून टाकायचा.

    या वाक्यांत गटागटा’- क्रियाविशेषण, ‘आणि’,‘’ ही उभयान्वयी अव्ययेतर पासून’ हे शब्दप्रयोगी अव्यय आणि अरेरे!’ हे केवलप्रयोगी अव्यय आलेले आहे.





                                                                                                                                            

 

 


No comments:

Post a Comment

Write a comment.