५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Monday, 8 November 2021

महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन

 

                                                  महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन                                                                      

      नोव्हेंबर

सामाजिक चाली-रीतींनी पिढ्यानपिढ्या बंद राहिलेली स्त्री- शिक्षणाची कवाडे उघडून स्त्रीशक्तीचे महत्व जगाला सिद्ध करून दाखविणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी १८ एप्रिल १८५८ साली झाला. मुरुडला त्यांचे प्राथमिक शिक्षण होऊन उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. रात्रंदिवस काबाडकष्ट करून ते मॅट्रिक झाले व गणित घेऊन १८८४ साली बी.ए. झाले.

१८९१ सालापासून पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी २०-२२ वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. याच सुमारास त्यांच्या पत्नीचे निधन झाले. अण्णांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न पुढे येऊन त्यावेळच्या पद्धतीनुसार तो कुमारिकेशी व्हायचा होता. त्या काळी विधवांना केशवपन, अंधारी खोली, मानहानीची अपमानस्पद वागणूक अशा पद्धतीने बागवले जात असे. या स्त्रियांवरील अन्यायाची समाजाने दखल घ्यावी या नवविचाराची 'अण्णांनी' स्वत:पासून सुरुवात करून मित्राच्या विधवा बहिणीशी पुनर्विवाह केला. त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला.

अण्णांचा पुनर्विवाह म्हणजे स्त्रीजीवनाच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ होती. त्यांच्या पत्नीचे नाव आनंदी पण सर्वजण तिला 'बाया' म्हणत अण्णा आणि बायांनी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. अण्णांनी १८९९ साली अनाथ बालिकाश्रम काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. रा. गणेश गोविंद गोखले यांनी त्यांच्या हिंगण्याला असलेल्या जमिनीपैकी सहा एकर जमीन आणि ७५० रुपये अण्णांच्या या कार्याला मदत म्हणून देऊ केली या निर्मनुष्य आणि उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडीनिर्मनुष्य आणि उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली ही स्त्रीशिक्षणाची पहिली वास्तू होय.

अखिल भारतीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना त्यांनी 'महिला विद्यापीठा'च्या कल्पनेचा पुरस्कार केला. दि. ३ जून १८९६ या दिवशी पहिले महिला विद्यापीठ स्थापन झाले. अण्णा या विद्यापीठाचे संस्थापक व संघटक होते. सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. 'श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ' म्हणून ही संस्था नावारूपास आली. राज्य सरकारने त्याला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला.

अण्णांनी १९०४ साली 'अनाथ बालिका वसतिगृह' 'विधवांसाठी वसतिगृह' सुरू केले. १९०८ साली त्यांनी 'निष्काम कर्ममठाची स्थापना करून सेवाव्रतींना मार्गदर्शन केले. वाईची 'आदर्श कन्याशाळा', पुण्यातील'महिला निवास', साताऱ्याचे 'बालमनोहर मंदिर', पुण्याचे 'बाल अध्यापन मंदिर', 'शिशुविहार' अशा त्यांच्या अनेक संस्थांनी सामाजिक व शैक्षणिक परिवर्तन घडविले.

१८ एप्रिल १९५८ रोजी अण्णांची जन्मशताब्दी पं. नेहरूंच्या अध्यक्षतेखाली साजरी झाली. त्याचवर्षी 'भारतरत्न' पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. रूढी बंधनात जखडलेल्या स्त्री उद्धारासाठी झटणाऱ्या अण्णांचे ९ नोव्हेंबर १९६२ रोजी १०४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. अखंड परिश्रम व कार्याची नितांत तळमळ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते!

No comments:

Post a Comment

Write a comment.