५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Wednesday, 29 December 2021

दुट्प्पी वर्तन !


दुट्प्पी वर्तन !

एकदा एका जंगलामध्ये एका कोल्हाच्या मागे एक शिकारी लागला होता. त्याला टाळीत कोल्हा लपत छपत पुढे पुढे पळत होता. परंतु शिकारी त्याचा पाठलाग सोडीत नव्हता. पळता पळता कोल्ह्याने एका लाकूडतोड्याला पाहिले. हा लाकूडतोडया आपल्याला नक्की मदत करील असे वाटून कोल्हा त्याच्याकडे आला आणि आपले पंजे जोडून म्हणाला.


Sunday, 26 December 2021

वाक्प्रचार

  वाक्प्रचार   मराठी व्याकरण 


Friday, 24 December 2021

समान अर्थाचे शब्द

 समान अर्थाचे शब्द शिष्यवृत्ती परीक्षा महत्वपूर्ण घटक 



Thursday, 23 December 2021

दहावी भूगोल प्रश्नसंच

  दहावी भूगोल प्रश्नसंच 



पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

                (१) ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?

उत्तर : ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस पडतो.

(२) बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून  भारतात कोणते जलचर पकडले जातात?

उत्तर : बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून शेवंडे, लबी चकई (क्लूपिड्स), रावस इत्यादी जलचर पकडले जातात.

(३) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात ?

उत्तर : ब्राझीलकडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे येतात.

(४) ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो ?

 उत्तर : ब्राझीलमधील वाऱ्यांना अजस कड्याचा व ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो.

Monday, 20 December 2021

महाराष्ट्राचा भूगोल सराव प्रश्न संच

 महाराष्ट्राचा भूगोल सराव प्रश्न संच 


शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्न भाषाज्ञान

 शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्न भाषाज्ञान 



Thursday, 16 December 2021

विरामचिन्हे मराठी व्याकरण

 मराठी व्याकरण विरामचिन्हे उदाहरणासह 

Wednesday, 15 December 2021

दहावी भूगोल पर्यटन ,वाहतूक व संदेशवहन test

 

दहावी भूगोल पर्यटन ,वाहतूक व संदेशवहन 



Sunday, 12 December 2021

Saturday, 11 December 2021

खेळ मराठी इंग्रजी भाषिक


 मराठी इंग्रजी भाषिक खेळ खेळा आणि शब्द पाठांतर करा .


Sunday, 5 December 2021

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार, हिंदू समाजातील दलित वर्गाचे कैवारी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील 'मह' या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईच नाव भीमाबाई. बाबासाहेब लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते; परंतु ते अस्पृश्य जातीत जन्मास आले होते. त्या काळी अस्पृश्य समाजाला अत्यंत हीन वागणूक मिळत असे. सवर्ण लोक अस्पृश्यांचे तोंड पाहणे, त्यांना स्पर्श करणेही टाळीत असत. या अस्पृश्यतेची झळ डॉ. आंबेडकरांना विद्यार्थिदशेत फार बसली. ते केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना संस्कृत शिकता आले नाही. शाळेत त्यांना पर्शियन भाषा घ्यावी लागली. संस्कृतचा अभ्यास त्यांनी स्वकष्टाने केला. १९०७ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. १९१२ मध्ये ते बी.ए. झाले. बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली व त्यानंतर पीएच्.डी. पदवीही मिळविली. अमेरिकेतून परत आल्यावर त्यांना बडोदे संस्थानमध्ये नोकरी मिळाली; पण तेथेही त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. ते केवळ अस्पृश्य म्हणून त्यांना गावात राहावयास जागा मिळेना. कार्यालयातील हाताखालचे लोकसुद्धा बाबासाहेबांशी अत्यंत तुच्छतेने वागत.

आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषिताला सुद्धा जर अशी अमानुष, हीन वागणूक मिळते तर खेड्यापाड्यात, अज्ञानात, दुःखदारिद्र्यात पिढ्यान्पिढ्या खिचपत पडलेल्या आपल्या अस्पृश्य समाजाला कोणत्या प्रकारची वागणूक मिळत असेल; त्यांना किती अनन्वित छळ सोसावा लागत असेल या विचाराने बाबासाहेब अतिशय दुःखी झाले. त्यांनी 'मूकनायक' नावाचे पाक्षिक काढून त्यातून दलितांवरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन आपल्या दलित बांधवांना, न्याय्य हक्कांसाठी संघर्षास सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दलि बांधवांना संदेश दिला. 'उठा, जागे व्हा, शिक्षण घ्या, आपण आपल्या बांधवांचा करा, कुणाच्या दयेवर जगू नका.'

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अनेक चळवळी केल्या. नाशिक काळाराम मंदिर, महाडचे चवदार तळे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी आंदोलने केली. १९२७ साली महाडला अस्पृश्यताविरोधी परिषद भरली होती. बाबासाहेबांनी अस्पृश्य बांधवांसह चवदार तळ्यातील पाण्याला स्पर्श केला; मनुस्मृतीची होळी केली; लंडनमधील गोलमेज परिषदेत म. गांधींना विरोध करून दलितांची बाजू प्रभावीपणे मांडली. भारताची घटना तयार करण्याचे काम करणाऱ्या समितीचे प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी केले. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्याव बाबासाहेब केंद्रीय मंत्रिमंडळात गेले व कायदामंत्री झाले; पण मतभेदामुळे त्यांनी नंतर राजीनामा दिला. ते काही काळ राज्यसभेचे सभासद होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांनी विचारपरिप्लुत अनेक ग्रंथ लिहिले. अस्पृश्यांवर होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी अनेक वेळा धर्मातराची घोषणा केली. शेवटी १९५६ साली दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूर येथे आपल्या हजारो अस्पृश्य बांधवांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ६ डिसेंबर १९५६ रोजी ते बुद्धवासी झाले. बाबासाहेबांना 'भारतरत्न' हा बहुमान १९९० साली मरणोत्तर प्रदान करण्यात आला.