५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Thursday, 23 December 2021

दहावी भूगोल प्रश्नसंच

  दहावी भूगोल प्रश्नसंच 



पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

                (१) ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?

उत्तर : ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त पाऊस पडतो.

(२) बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून  भारतात कोणते जलचर पकडले जातात?

उत्तर : बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून शेवंडे, लबी चकई (क्लूपिड्स), रावस इत्यादी जलचर पकडले जातात.

(३) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात ?

उत्तर : ब्राझीलकडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे येतात.

(४) ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो ?

 उत्तर : ब्राझीलमधील वाऱ्यांना अजस कड्याचा व ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो.

 

(५) ब्राझीलमधील अजस्र कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते?

उत्तर : ब्राझीलमधील अजस कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे अडणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रतिरोध प्रकारची वृष्टी होते.

 

 (६) ब्राझीलमधील कोणत्या  भागात सरासरी तापमान कमी आहे ?

ब्राझीलमधील पॅराग्वे –पॅराना खोरे या भागात सरासरी तापमान कमी आहे

 (७) सरासरी आयुर्मान म्हणजे काय ?

उत्तर : एखादया प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी, म्हणजे 'सरासरी आयुर्मान' होय.

 

८) जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र भारताने व्यापले आहे ?

उत्तर : जगाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे २.४१ टक्के भूक्षेत्र व्यापले आहे.

(९)आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना कोणते चलन वापरले जाते ?

 उत्तर : आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे 'डॉलर' हे चलन वापरले जाते.

 

(१०) जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या

भारतात आहे ?

उत्तर : जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आहे.

(११) जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूक्षेत्र ब्राझीलने व्यापले आहे?

उत्तर : जगाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ५.६ टक्के भूक्षेत्र ब्राझील व्यापले आहे.

(१२) भारतातील गोड्या पाण्यात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून

कोणते जलचर पकडले जातात ?

उत्तर : भारतातील गोड्या पाण्यात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून कटला, रोहू, चोपडा इत्यादी जलचर पकडले जातात.

(१३) भारतात कोणत्या ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन

केले जाते ?

उत्तर : भारतात नदया, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन केले जाते.

 

(१५) ब्राझीलचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो?

उत्तर: ब्राझीलचा जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, भारत इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.

(1६) भारताचा कोणत्या देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो ?

 उत्तर : भारताचा युनायटेड किंग्डम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया, ब्राझील इत्यादी देशांशी आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.

(१७) भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे ?

उत्तर  : भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जानिर्मिती, शेती व्यवसाय, खाणकाम, उदयोग आणि वाहननिर्मिती  इत्यादी क्षेत्रात  गुंतवणूक केली आहे .

 

ब्राझीलमधील  विविध भागांत घेतली जाणारी पिके (१)कॉफी (२) तांदूळ (३) सोयाबीन (४) मका (५) ऊस (इ) काकोओ (७) रबर (८) केळी (९) संत्री (१०) अननस इत्यादी

 

नशील विविध भागांत आढळणारी खनिजे :

(१) सोहखनिज (२) मँगनीज (३) निकेल (४) बॉक्साइट

 (५) तांबे इत्यादी.

 

 

 

ब्राझीलच्या किनारपट्टीच्या प्रदेशांत मासेमारीतून पकडले जाणारे जलचर : (१) स्वोर्ड (२) कोळंबी (३) लॉबस्टर (४) सार्डिन इत्यादी.

 

भारतातील विविध भागांत घेतली जाणारी पिके :

 (१) गहू(२) वांदूळ (३) ज्वारी (४) बाजरी (५) मका (६) कापूस

(७) ऊस (८) चहा (९) कॉफी (१०) रबर (११) ताग

(१२) सफरचंद (१३) मसाल्याचे पदार्थ (१४) आंबे इत्यादी.

 

 अरबी समुद्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीतून भारतात पकडले

जाणारे जलचर :

 (१) वशी (२) बांगडा (३) बोंबील (४) सुरमई (५) पापलेट (६) झिंगे इत्यादी.

 

मासे हा आहारातील प्रमुख घटक असणारी भारतातील किनारपट्टीवरील राज्ये : (१) महाराष्ट्र (२) गोवा (३) केरळ

(४) तमिळनाडू (५) ओडिशा (६) पश्चिम बंगाल इत्यादी.

 

(७) खनिजांचे साठे असलेली भारतातील राज्ये : (१) झारखंड (२) ओडिशा (३) छत्तीसगढ (४) मध्य प्रदेश (५) राजस्थान (६) कर्नाटक (७) तमिळनाडू (८) महाराष्ट्र इत्यादी.

 

(८) भारतातील तेल शुद्धीकरण केंद्रे : (१) कोयाली (२) दिग्बोई (३) नूनमती (४) बोंगाईगाव (५) बरोनी (६) मथुरा इत्यादी.

 

(९) ब्राझीलमध्ये आयात केली जाणारी उत्पादने : (१) यंत्रसामग्री

(२) रासायनिक उत्पादने (३) खते (४) गहू (५) वाहने (६) खनिज तेल (७) वंगण इत्यादी.

 

(१०) ब्राझीलमधून निर्यात केली जाणारी उत्पादने : (१) कॉफी

(२) कोको (३) सोयाबीन (४) कापूस (५) साखर (६) संत्री

(७) केळी (८) तंबाखू (९) लोहखनिज इत्यादी.

 

११) भारतामध्ये आयात केली जाणारी उत्पादने : (१) खनिज तेल (२) यंत्रसामग्री (३) मोती (४) मौल्यवान खडे (५) सोने

(६) चांदी (७) कागद (८) औषधे इत्यादी.

 

१२) भारतातून निर्यात केली जाणारी उत्पादने : (१) चहा (२) कॉफी (३) मसाल्याचे पदार्थ (४) कमावलेले कातडे (५) कातडी वस्तू (६) लोहखनिज (७) कापूस (८) रेशीम कापड (९) आंबे इत्यादी.

No comments:

Post a Comment

Write a comment.