५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Saturday, 12 March 2022

कवितेचे रसग्रहण -कसे लिहावे

 


कवितेचे रसग्रहण -कसे लिहावे

महत्वाचे   मुद्दे   पुढीलप्रमाणे 

१.प्रश्न २ आ साठी ४ गुण विभागणी

२. कृतिसाठी खालील मुद्दे

३.सर्व कविता सार तक्ता

 ४.उदाहरणदाखल उत्तर पहा

५. कृतिपत्रिकेतीलप्रश्न २ ( इ ) साठी गुण ४ रसग्रहण

६. उदाहरणदाखल उत्तर पहा

कृतीपत्रिकेत प्रश्न २ आ साठी ४ गुण

पाठ्यपुस्तकातील कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे.

कृतीपत्रिकेत १,१ गुणाचे दोन कृती तर २ गुणाची एक कृती विचारली जाईल एकूण ४ गुण

 

कृतिसाठी खालील मुद्दे १_१ गुणांसाठी

प्रस्तृत कवितेचे कवी / कवयित्री

कवितेचा रचनाप्रकार

कवितेचा काव्यसंग्रह

कवितेचा विषय

कवितेतून व्यक्त होणारा (स्थायी ) भाव

कृतिसाठी खालील मुद्दे २-२ गुणांसाठी

कवितेच्या कवींची / कवयित्रींची लेखनवैशिष्ट्ये

 कवितेची मध्यवर्ती कल्पना

 कवितेतून व्यक्त होणारा विचार

कवितेतील आवडलेली ओळ

 कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे

कवितेतून मिळणारा संदेश

कृती सोडवण्यासाठी अभ्यास असा करावा

 

कवी /कवयित्रीचे नाव, संदर्भ, प्रस्तावना, वाड्:मय प्रकार या मुद्दयासाठी पाठ्यपुस्तकातील कवितेच्या सुरुवातीला दिलेल्या परिचयात्मक मजकूर बारकाईने वाचावा व लक्षात ठेवावा.

 

कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश,भाषिक वैशिष्टये, आवडनावड यासाठी कवितेचा भावार्थ नीट अभ्यासावा.

कवितेतील आवडणा-या ओळी या कृतीसाठी कवितेतील ओळ / ओळी पाठ कराव्याच लागतील.

 

खालील प्रमाणे तक्ता पाठच करा.

 सर्व कविता सार तक्ता

 

कवितेचे नाव

कवी / कवयित्री

रचनाप्रकार

 

कवितेचा विषय

कवितेचा काव्यसंग्रह

कवितेतून व्यक्त होणारा स्थायीभाव

उत्तम लक्षण

संत रामदास

ओवी

उत्तम माणसाची लक्षणे

श्रीदासबोध

आदर्श माणसे घडविण्याचा ध्यास

 

वस्तू

द . भा. धामणस्कर

मुक्तछंद

निर्जीव वस्तूंचा सजीवपणा

भरून आले आकाश

 

निर्जीव वस्तूंमधून खरे तर मानवी जीवनच व्यक्त होते.

आश्वासक चित्र

नीरजा

मुक्तछंद

 स्त्री-पुरुष समानता

निरर्थकाचे पक्षी

स्त्री-पुरुष समानता येणारच, हा कवयित्रींच्या मनातला आशावाद

भरतवाक्य

मोरोपंत

आर्या

सज्जन माणसाचे महत्व

केकावलि

सज्जन माणसाच्या सहवासात राहणे सुखकारक असते.

खोद आणखी थोडेसे

आसावरी काकडे

अष्टाक्षरी छंद

 

प्रयत्न व सकारात्मकता याचे महत्व

लाहो

 

चिकाटी, जिद, आशावाद यामुळे मनाला उमेद मिळते

आकाशी झेप धे रे.

 

जगदीश खेबुडकर

 

गीतरचना

 

स्वसामर्थ व स्वातंत्र्य मोलाचे असते.

एक चित्रपट गीत

स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवून स्वातंत्र्याचे मोल आणत जगण्याची प्रेरणा देणारा भाव

तू झालास मूक समाजाचा नायक

ज. वि. पवार

मुक्तछंद

 

डॉ. बाबासाहेब अबिडकर यांचे महात्म्य

नाकेबंदी

सर्वहारलेल्या समाजात अशक्यप्राय वाटणारी जागृती करून त्याला स्वबळावर उभे केल्याबद्दल कृतनता गाव

 

 

उदाहरण दाखल उत्तर पहा

तू झालास मूक समाजाचा नायक

(१) प्रस्तुत कवितेचे कवी  ज. वि. पवार

 

(२) कवितेचा रवनाप्रकार मुक्तछंद

 

(३) कवितेचा काव्यसंग्रह नाकेबंदी

 

(४) कवितेचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे माहात्म्य.

 

(५) कवितेच्या कवींची लेखनवैशिष्ट्ये कविता मुक्तछंदात आहे. तूपरिस्थितीवर स्वार झालास', 'इतिहास घडवलास', 'रणशिंग फुंकलेस गुलामांच्या पागातल्या बेडवल्यास आकाश हादरलं. पृथ्वी डचमळली. चवदार तळवाला आग लागली यांसारख्या या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे. पूर्वी दलित समाज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली खवळून उठला होता. तथाकथित उपवर्णीयांमध्ये खळबळ माजली होती. हे पदारळपाला आग लागली या शब्दांतून प्रखरपणे व्यक्त होते. आता दलित समाज शांत झाला आहे. ही बाब चवदार तळवाचे पाणी थंड झालंय या होते.

 

(६) कविता वाहण्याची कारणे ही कविता अतिशय चांगली आहे. ओजस्वी पशब्दांनी ओतप्रोत भरलेली आहे. कविता वाचत जाता बाबासाहेबांची महानता स्पष्ट होत जाते. त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजावा प्रत्यय येतो. शेवटच्या कडव्यात मात्र कलाटणी आहे शेवटाकडव्याच्या आधीच्या कडव्यात प्रखर तेजाचा प्रत्यय येत राहतो. मात्र आता तोच दलित समाज शांग खंडवाल्यांनी दुःखद जाणीव व्यक्त होते ही जाणीव शेवटच्या केवळ चार ओळी व्यक्त झाली असतानाही आधीच्या जाज्वल्य भवतीच्या मीवर मनाला व्याकूळ कसते. हा दुसाभाव हाथ या कवितेचा आत्मा आहे.

कृतिपत्रिकेतील प्रश्न २ ( इ ) साठी गुण ४

 

हया कृतीत पाठ्यपुस्तकातील कोणत्याही कवितेतील दोन किंवा चार ओळी रसग्रहणासाठी असेल.. । कृतिपत्रिकेत दिलेल्या पंक्तीचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण अपेक्षित आहे.

 

१) आशयसौंदर्य                            २) काव्यसौंदर्य                                        ३) भाषिक वैशिष्ट्ये

आशयसौंदर्य :

यात कवीचे / कवितेचे नाव, कवितेचा विषय मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्दयांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तीसाठी सर्व मुद्दे सारखेच राहतील.

 

काव्यसौंदर्य :

यात दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना प्रतिमा, विविध भावना या विषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तीला अनुसरून लिहावी लागणार आहे. यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.

भाषिक वैशिष्टये :

यात कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे.

( ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदात्मक चित्रदर्शी यापैकी कोणती ) आंतरीक लय, नादमादुर्य, अलंकार, या मुद्द्यांना अनुसरून माहिती असावी कवितेतील कोणत्याही दोन पंक्तीसाठी सर्व मुद्दे सारखेच राहतील.

 उदाहरण दाखल उत्तर पहा :

'घामातुन मोती फुलल

श्रमदेव घरी अवतरले.'

 

उत्तर : आशयसौंदर्य: सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबूडकर यांची 'आकाशी झेप घे रे' ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, पावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावं, हा अमूल्य संदेश ही कविता देते.

काव्यसौदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कार केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व कावाडकाट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खुपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमांचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.

भाषिक वैशिष्ट्ये : ग्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. साळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा है या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रिजरा" हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला "पक्षी म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसत.

 

1 comment:

Write a comment.