५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Wednesday, 22 June 2022

मोठ्या दिलाचा राजा--राजर्षी शाहू

 

मोठ्या दिलाचा राजा--राजर्षी शाहू


इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा

झुकवून मस्तक करशील, तयांना मानाचा मुजरा

उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज आपणासमोर विषय मांडत आहे. दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा'शाहू महाराज' कोल्हापूरचे संस्थानिक ख्यातनाम समाजसुधारक, दलितोद्धारक के सार्वजनिक कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावरील एक छोटंसे गाव म्हणजे कागल. गाव जरी  लहान होत तरी त्याला इतिहास होता. कागल एक संस्थान होते आणि संस्थानचे संस्थानिक जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे हे मनाने मोठे दिलदार बाणेदार होते. त्यांना शोभणाऱ्या त्यांच्या पत्नी राधाबाई या पुण्यशिल जोडीच्या पोटी खरे तर आधुनिक भारताच्या भाग्यविधात्याचा आरक्षणाच्या जणकाचा आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा पाया घालण्याऱ्या खऱ्या खुऱ्या महर्षीचा जन्म झाला म्हणावयास हरकत नाही.

जन्मानंतर यशवंत नाव लाभते. पण अवघ्या दहा वर्षानंतरच कोल्हापूरच्या राजमाता आनंदीबाई यानी १७ मार्च १८८७ रोजी त्यांना दत्तक घेतले आणि यशवंताचे 'शाहू' झाले. हेच शाहू पुढे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज झाले. आपल्या सत्तेचा उपयोग ऐषआरामासाठी न करता गोरगरीब, दीन दुबळ्या, अनाथ अबालवृद्धांच्या सेवेसाठी खर्च केला. आपल्या कार्य कर्तृत्वारे कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे अशा सर्वच क्षेत्रात ते यशवंत झाले.

वडीलाप्रमाणेच शाहू महाराज हे देखील कसदार पिळदार शरीरयष्टी लाभलेले होते. त्यांच्या धिप्पाड शरीराप्रमाणेच आकशा ऐवढे मनही मोठे. या मोठ्या मनातही मोठ्याबद्दल आदर होता, दीन दुबळ्याबद्दल कळवळा होता. 'शिवसंभव' नाटकातील शिवजन्माचा प्रसंग येताच शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरुन ताडकन उठून उभे राहिले आणि त्यांनी नाटकातील शिवाजी महाराजांना लवून मुजरा केला. तर मोतद्दार असलेल्या गंगाराम कांबळे यांना बावड्यात बंगल्यावरील हौदातील पाणी पिले म्हणून बेदम मारहाण करणाऱ्या संबंधितांना शिक्षा केली आणि गंगाराम यांना भाऊसिंगजी रोडवर हॉटेल व्यवसाय सुरु करून दिला. एवढेच नव्हे तर महाराज स्वतः नित्यनेमाने हॉटेलला भेट देवून चहा घेवू लागले. पुढे त्यांनी 'सोडा वॉटर मशीन' कांबळे यांना दिल्याची नोंद आढळते. असा मोठ्या दिलाचा राजा होता.

समाजातील गोर-गरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारा राजा होता. समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक जुन्या प्रथांना लाथाडून त्यांचे उच्चाटन केले. जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन महिला संरक्षण कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन. यासारखे धाडसी निर्णय घेवून कृतीत आणले. स्वतःच्या बहिणीचा आंतरजातीय विवाह लावून देणारा हा राजा काळाच्या पुढे चालत होता.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा काढला. २१ मे १९१९ आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ ला शिक्षण खात्याला आदेश देवून अस्पृश्यांना समानतेची वागणूक देण्यास भाग पाडले.  तर ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात.

६ जुलै १९०२ पासून मागासवर्गीयांसाठी नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषला केली. कुलकर्णी वतने बंद करुन तलाठी काम सुरु केले. सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वेगवेगळी वसतिगृहे काढणारा हा जगातला एकमेव राजा होता.

'माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्याद्वाराचे कार्य थांबणीवर नाही,असे म्हणणाऱ्या राज्याला अस्पृश्य जनता आपला उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते.

दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी व कल्याणकारी कार्याला महाराजांनी महत्त्व दिले. युरोपच्या दौऱ्यावर असता काही धरणे पाहून राधानगरीतील धरण बांधूनकोल्हापूरला एक अमोल देणगी देवून हरितक्रांतीच घडवून आणली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकरी संघ स्थापन केला. १८९५ साली शाहुपूरी ही व्यापारपेठ वसविली. १९०६ साली शाहू (कापड) मिलची स्थापना केली. १९१२ ला बलभीम सहकारी सोसायटींची स्थापना केली आणि महाराष्ट्राला सहकाराचा मंत्र दिला. यामुळेच कोल्हापूरच्या गुळाने जागतिक बाजारपेठेत स्थान मिळविले. शेती, व्यापार, उद्योग व सहकाराला भरभराटी यावी म्हणून त्यांनी प्रयत्य केले. काळम्मवाडीच्या धरणाचा सुद्धा पाया त्यांनीच घालून ठेवला होता.

महाराजांनी समाजातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढली. बेरड, मांग, फासेपारधी या सारख्या लोकांना गुन्हेगार समजून रोज हजेरी द्यावी लागे ती  पद्धत बंद केली. त्यांना माणसात आणले. केवढे मोठे मन त्यांचे होते.

महाराजांना शिकारीचा मोठा छंद होता. शिकारीच्या छंदा इतकाच कला क्रिडेचा छंद होता. लोकजीवनाला कला क्रीडा, नाट्य, आणि संगीत या कलांची जोड असावी असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी मल्लविद्येला प्रोत्साहन देऊन अनेक मल्लांना राजाश्रय दिला. अल्लादिया खाँसारखे गानमहर्षी व बाबूराव पेंटरांसारखे चित्रमहर्षी या सारख्या कलावंताना राजाचे छत्र लाभले. कलांची व कलावंतांची जोपासना करत असतना कोल्हापूरला त्यांनी 'कलापूर' करुन टाकले. कलावंताना राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळवून दिला.

अशा या मोठ्या दिलाच्या राजाची कार्य कर्तृत्वाची गाथा थोडक्यात सांगणं  अशक्यप्राय आहे. ती देखील समुद्राप्रमाणे अथांग आहे. महाराजांची राहणी अगदी साधी होती. राजा असतानाही शेतकऱ्यांचा पेहरावा करणारा. पंचपक्वान्नांचा त्याग  करुन शेतकऱ्यांसारखे अन्न खाणारा. पलंगाचा त्याग करुन खॉटवर, जमिनीवर व उघड्यावर झोपणारा राजा. बोलण्यात देखील साधेपणा होता. सामाजिक व शैक्षणिक कार्यात केलेल्या कामामुळेच महाराजांना कानपूरच्या क्षत्रिय परिषदेत ‘राजर्षी' ही पदवी देण्यात आली. त्यांना माणसातला राजा आणि राजातला ऋषी षीतला राजा मानला जात होते. त्यामुळेच लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात. त्याचप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत. अशा या राजाला ६ मे १९२२ देवाज्ञा झाली. या मोठ्या दिलाच्या राजाला कोटी कोटी प्रणाम करून मी ढेच म्हणेन...

उगा कशाला दवडू । माझ्या शब्दांचे बुडबुडे ।

तुझे पोवाडे गातील । पुढती तोफांचे चौघडे ।

तोफांचे चौघडे ।

प्रभावी भाषणे | -सदर पुस्तक आपण मागवू शकता      संपर्क-८७८८६२९१३३

                                                                                       लेखन -संजय   मगदूम

No comments:

Post a Comment

Write a comment.