५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Tuesday, 9 August 2022

महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी

 महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी



महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत म्हणजे सत्पुरुष आहेत .  संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच   समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत.या पवित्र भूमीतील महाराष्ट्रात सर्व संतांना प्रिय असलेले पवित्र निर्मळ तिर्थक्षेत्र म्हणजे पंढरी. पंढरी म्हणजे संतांचे माहेर घर. परंतु अनेक तीर्थक्षेत्रांपैकी संतांनी पंढरीलाच आपले माहेर घर का म्हणाले?

सकळ देवांचे माहेर । सकळ संतांचे निजमंदिर। ते हे पंढरपूर जाणावे ।।

पंढरी हे माहेर आणि विठाई ही सर्वांची माऊली आहे. या माऊलीला पंढरीत आणण्याचे सर्व श्रेय पुंडलिकांचे आहे. त्यानेच पांडुरंगाला पंढरीत उभे केले. जेव्हापासून पंढरीत पांडुरंग विराजमान झाले, तेव्हापासून सर्व संतांनी पंढरपूरला आपले माहेर बनवले. सर्व संतांना पंढरी जीव की प्राण आहे. पंढरीत प्रेमळ संत नांदतात. देव आणि संतांचा इथे मेळा  होतो.

ऐसे संतमार ऐसे भीमातीर ।

ऐसा जयजयकार सांगा कोठे ।।

संसारा अलिया जा रे पंढरपुरा।

पांडुरंग सोयरा पहा आधी ।।

पंढरपुरात वास्तव्यास असलेला पांडुरंग हा आपला सोयरा आहे. पंढरीच्या सुखासारखे सूख त्रिभूवनात नाही. पंढरीत ज्ञानाचा अहंकार नाही, पण भक्तीचा जिव्हाळा आहे. म्हणूनच साऱ्या संतांना पंढरीस जाणे आवडीचे आहे. महाराष्ट्रातील अनेक वारकरी मंडळी , अनेक दिंड्या अनेक फड हे पायी वारी करत पंढरीस जातात. टाळ, मृदूंग, पताका, झेंडे अशा प्रकारे अनेक दिंड्या आपापल्या ठिकाणाहून पंढरीला पांडुरंगाच्या भेटीला जातात. संतांनी सुरू केलेला हा उपक्रम अलौकिक आहे. संतांचा आदेश म्हणजे केवळ मंदिरातील व देवघरातील विचारांची पोथी नव्हे, तर तो एक उदात्त जीवनाचा पथदर्शक आहे. समाजात समृद्ध अवस्था निर्माण करणारी व त्याचबरोबर समाजाचा आदर्श, महान जीवनाचे दर्शन करवून घेणारी ती एक जीवनदर्शी निर्मळ विचारप्रणाली आहे.

                        म्हणूनच, उभारूनी बाह्या सकळा आश्वासना या रे अठरा वर्ण पंढरीसी ।। या न्यायाने महाराष्ट्रातील प्रत्येक जातीधर्मातील लोक आणि वारकरी पंढरीस वास्तव्यास जातात. अनवाणी पायांनी टाळ, मृदूंगाच्या गजरात पायी चालत जाताना विठ्ठलाचे नामस्मरण आणि चिंतन करतात. संतांनी घालून दिलेला हा पायंडा केवळ बुद्धीवर आधारलेला नसून श्रेष्ठ मनोवृत्तीवर आणि सद्विचारांवर आधारलेला आहे. प्रेम, श्रद्धा, भक्ती, नम्रता, परोपकार, कृतज्ञता, निरहंकरिता, क्षमाशीलता, संतुष्टता इ. अनेक श्रेष्ठ मनोवृत्तीवर माणूस जगतो. या मनोवृत्तींचा जीवनात अंतर्भाव केल्यामुळे त्याचे आयुष्य समृद्ध होते आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून संतांनी पंढरीच्या वारीला जाण्यासाठी सुरवात केली असावी. कारण संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज अशा अनेक थोर संतांच्या पादुका पंढरीसी पालखीच्या द्वारे जातात. म्हणून पंढरी हे तीर्थक्षेत्र संतांसाठी निगमाचे माहेर आहे.

महाराष्ट्रातील वारकरी मंडळींनी संतांची ही परंपरा मनोभावे जपली आहे, उन, वारा, पाऊस कोणत्याही संकटांची हूरहूर न बाळगता हा वारकरी आनंदाने, उत्साहाने पंढरीसी पायी चालत जातो. समाज परिवर्तनाचे एक उत्कृष्ट माध्यम म्हणजे ही पंढरीची पायी वारी आहे. महाराष्ट्रातील संस्कृती जपणारी आणि त्याचे रक्षण करणारी ही एक प्रतिभावंत कलाच आहे. संत एकनाथ महाराजांचा हा अभंग म्हणावासा वाटतो.

माझ्या वडिलांचे दैवत ।

कृपाळू हा पंढरीनाथ ।।

पंढरीसी जाऊ चला ।

भेटू रखुमाई विठ्ठला ।।

पुंडलिके बरवे कले ।

कैसे भक्तीने गोविले ।।

एका जनार्दनी नीट ।

पायी जडलीसे वीट ।।

अशारितीने महाराष्ट्रातील संतांपासून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत साऱ्या भाविकांचा ओढा आषाढी एकादशीनिमित्त पंढरीकडे असतो. परंतु पंढरीलाच एवढे महत्त्व का द्यावे? संत एकनाथ महाराज म्हणतात,

(लेखिका संत एकनाथांच्या वंशज आहेत.)

No comments:

Post a Comment

Write a comment.