५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Friday, 30 September 2022

राष्ट्रपिता महात्मा गांधी

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी          


 *सेवापथक सुरु 

*स्त्री-पुरुष समानतेची दरी

हरिजन फंड

*'महात्माउपाधी

*करेंगे या मरेंगे'संदेश  

 सेवापथक सुरु 

                   भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले त्या राष्ट्रपिता गांधींचा (मोहनदास करमचंद गांधी) जन्म काठेवाडात पोरबंदर येथे २ ऑक्टोबर    १८६९ रोजी झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानचे दिवाण होते. म. गांधींचा विवाह त्यांच्या चौदाव्या वर्षी कस्तुरबांशी झाला. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आल्यावर ते  दक्षिण आफ्रिकेतील जुलमी गोऱ्या राज्यकर्त्या विरुद्ध लढा देण्यासाठी  आफ्रिकेत गेले. तेथे त्यांना वर्णभेदाचा अतिशय वाईट अनुभव आला . तेथे गोरे इंग्रज हिंदी लोकांवर अतोनात जुलूम करीत असत. त्यांना गुलामासारखे वागवत . आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे इंग्रज ठरवीत. म.गांधीनी स्वत: त्याचा अनुभव घेतला. हिंदी लोकांवर होणारा जुलूम नाहीसा करण्यासाठी म.गांधींनी अहिंसेच्या व सत्याग्रहाच्या मार्गांनी चळवळ केली. दक्षिण आफ्रिकेत  युद्ध चालू असताना जखमी लोकांवर औषधोपचार करण्यासाठी त्यांनी सेवापथक काढले.

स्त्री-पुरुष समानतेची दरी 

९१५ साली म.गांधी आफ्रिकेतून परत आले. भारतात सर्वत्र हिंडून आपल्या  लोकस्थितीची पाहणी केली. गुरुस्थानी मानलेल्या नामदार गोखल्यांचा सल्ला घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर अगोदर आपल्या तील उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, मालक-मजूर, स्त्री-पुरुष समानतेची दरी नाहीशी करावयास हवी हे त्यांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे देशविघातक, जुलमी, अन्यायी धोरणांना विरोध करताना अहिंसा व सत्याग्रह   या साधनांचा    वापर करण्याचा त्यांनी निश्चय केला.

 हरिजन फंड 

१९२० साली लो. टिळकांचे निधन झाल्यावर काँग्रेसचे व पर्यायाने देशाचे नेतृत्व    महात्मा  गांधींच्याकडे आले. महात्मा गांधींनी आयुष्यभर फक्त देशाचीच सेवा केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या. त्यासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. हिंदु-मुसलमान यांच्यात एकी सावी, जातिजातीतील भेदभाव नाहीसा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले: त्यासाठी प्रसंगी उपोषणे केली. अस्पृष्यांच्या उद्धारासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले' अस्पृष्यांना त्यांनी 'हरिजन' हे नाव दिले. त्यांच्या उन्नतीसाठी हरिजन फंड जमविला.

'महात्माउपाधी

'साधी राहणी उच्च विचारसरणी' याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी.  एक उपरणे, साध्या चपला, अशा त्यांच्या दर्शनाने लोकांना ते आदरणीय नेता वाटत होते. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वावलंबन, साधी राहणी, स्वच्छता मोहीम, हिंदी  भाषा प्रचार, हरिजन उद्धार, हिंदु-मुसलमान ऐक्य इत्यादी त्यांच्या जनहित कार्यांमुळे त्यांच्या प्रत्येक चळवळीला, आंदोलनाला जनतेचा फार मोठा पाठींबा मिळाला. जनतेनेच त्यांना 'महात्मा' उपाधी दिली; 'राष्ट्रपिता' म्हणून त्यांचा गौरव केला.

करेंगे या मरेंगे'संदेश

महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाने, आचरणाने, त्यांच्या प्रत्यक्ष कार्याने प्रभावित लेली भारतीय जनता स्वातंत्र्यासाठी वाटेल तो त्याग करावयास सिद्ध झाली. हे लक्षात च त्यांनी १९४२ साली 'चले जाव, छोडो भारत', असे इंग्रजांना ठणकावून सांगितले. करेंगे या मरेंगे' असा जनतेला संदेश दिला. भारतीय जनता इंग्रजांविरुद्ध पेटून उठली. सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीमार, गोळीबार केला. असंख्यांना  तुरुंगात डांबले, पण सरकारचे हे प्रयत्न विफल ठरले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ९० वर्षे अनेकांनी अनेक मार्गांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला, यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांना भारत सोडून जावे लागले. भारत स्वतंत्र झाला. भारताची फाळणी  झाली. ही गोष्ट कित्येकांना आवडली नाही; त्यामुळेच ३० जानेवारी १९४८ महात्मा गांधींची हत्या झाली. त्यांना हुतात्म्याचे मरण आले.एका तेजोमय जीवनाचा अंत झाला !

adhik  mahiti 

No comments:

Post a Comment

Write a comment.