५ जून जागतिक पर्यावरण दिन

हिंदी दिन भाषण

My app

Pages

शिक्षक दिन

Friday, 28 October 2022

म्हातारी व वैद्य मराठी बोधकथा /marathi bodhaktha

   म्हातारी व वैद्य


    एका म्हातारीच्या डोळ्यांत 'फुले' पडल्याने तिला बरेच कमी दिसू लागले. तिने आपले डोळे गावातल्या एका नामवंत वैद्याला दाखविले व त्याचे औषध सुरू केले. तो वैद्द्य दररोज तिच्या घरी येई, तिच्या दोन्ही डोळ्यांत औषध घाली आणि तिच्या डोळ्यांना पट्टी बांधी. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येई, आदल्या दिवशीची पट्टी सोडून व नव्याने औषध घालून तो तिच्या डोळ्यांना नवी पट्टी बांधी. तिचे डोळे सदैव बांधलेले असल्याने, तो तिच्याकडून जाताना तिच्या घरातल्या एक-दोन वस्तू चोरून नेई. दोन महिन्यांनी जेव्हा तिला चांगले दिसू लागले व तिच्या डोळ्यांवरील पट्टी कायमची काढण्यात आली, तेव्हा तिला

आपल्या घरातल्या सर्व वस्तू वैद्याने लांबविल्या असल्याचे आढळून आले. तिने त्याबद्दल त्या वैद्याला एका शब्दानेही विचारले नाही. फक्त औषधोपचाराचे पैसे देण्याचे नाकारले. यावर त्या पैशांच्या वसुलीसाठी, वैद्याने त्या म्हातारीविरुद्ध न्यायालयात दावा  दाखल केला.

वैद्याला औषधाचे पैसे न देण्याचे कारण न्यायमूर्तींनी त्या म्हातारीला विचारता ती म्हणाली, "महाराज, या वैद्याचे औषध सुरू करण्यापूर्वी माझ्या डोळ्यांना जरी बरेच कमी दिसत होते, तरी अंधुक अंधुक का होईना, घरातल्या सर्व वस्तू दिसत होत्या व चाचपडल्या असता हातांना लागत होत्या. परंतु डोळ्यांवरचे या वैद्याचे औषधोपचार पूर्ण झाल्यापासून मला घरातली एकही वस्तू दिसत नाही किंवा हातांना लागत नाही."

त्या म्हातारीच्या बोलण्यामागे दडलेला अर्थ न्यायमूर्तींना समजला. त्यांनी त्या वैद्याच्या . घरावर शिपायांची धाड घालून, त्याच्या घरात दडवलेल्या म्हातारीच्या सर्व वस्तू तिला परत करण्याचा व त्याच्या चोरीच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून त्याला औषधापोटी म्हातारीने एक पैसाही न देण्याचा हुकूम फर्मावला.चोरी उघडकीस आली की, चोरलेली सर्व चीजवस्तूही गेली  आणि त्याबरोबरच चोरी करणाऱ्याची अब्रूही जाते.

तात्पर्य   -अति लोभ संकटाना निमंत्रण देतो.

No comments:

Post a Comment

Write a comment.