फरशी बसवणाऱ्या गवंड्याच्या मिठारवाडीतील मुलीचे यश, आदर्श विद्यालयाची संचिता 97 टक्के गुणांनी देवाळे केंद्रात प्रथम तर तालुक्यात व्दितीय क्रमांक
मिठारवाडी, ता.पन्हाळा फरशी फिटटींग तथा बांधकाम करत रोजीरोटी
चालवणाऱ्या एका गवंडयांच्या संचिता हंबीरराव जगाताप या मुलीने 97
टक्के गुण मिळवले. दुर्दम्य इच्छाशक्ती कष्ट करण्याची तयारी स्वत:वर
आणि शिक्षकावर विश्वास याचे बळावर कोणत्याही खाजगी
शिकवणीशिवाय तिने हे यश मिळवले आहे. मिठारवाडी सारख्या डोंगराळ
भागातील संचिताचे गुण नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरणारे आहेत. ती
आदर्श विद्यालय आंबवडे ता. पन्हाळा विद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
आदर्श विद्यालय आंबवडे शाळेचा निकाल 98% लागला असून सृष्टी
सहदेव जगदाळे 92% द्वितीय क्रमांक सानिका महेश पाटील 90% तृतीय
क्रमांक अक्षरा सचिन खुडे 87% चतुर्थ क्रमांक स्नेहल सरदार तोडकर 86%
पाचवा क्रमांक तर हर्षवर्धन सुरेश मगदूम 85% सहावा क्रमांक पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष
शंकरराव जगदाळे, सचिव सर्जेराव खुडे, खजानिस भारत माळी, सन्माननीय सर्व
संचालक, मुख्याध्यापक संभाजी जाधव, सहाय्यक शिक्षक संजय मगदूम, संजय मोरे,
सुशीला यादव, सुप्रिया कांबळे, यांचे मार्गदर्शन लाभले. तर लिपिक अमित शिपुगडे,
कर्मचारी सुभाष पाटील, भिकाजी जाधव, समाधान कांबळे, राजेंद्र जाधव, सर्व पालक व
ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी