Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الخميس، 17 يونيو 2021

वाक्यांचे प्रकार

 वाक्यांचे प्रकार

 मराठी भाषा बोलत असताना अनेक  अक्षर समूह एकत्र येऊन  शब्द बनतो. असे अनेक शब्द समूह एकत्र येऊन एक वाक्य तयार होते. आपल्या  बोलण्यातून अशी अनेक वाक्य एका मागून एक येत असतात. प्रत्येक वाक्य संपूर्ण विधान असते. असे विधान आपण   कोणाबद्दल काहीतरी बोलतो; म्हणजे विधान करतो , बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात व उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधी असे म्हणतात. प्रत्येक वाक्यात उद्देश्य व विधेय या गोष्टी असतात.  उदा. मित्राचा मुलगा आज बास्केटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला .या वाक्यात खेळला हे विधान कोणाला उद्देशून आहे? तर मुलगा याच्याबद्दल उद्देशून केले आहे. म्हणजे या वाक्यात मुलगा हे उद्देश आहे तर खेळला हे विधेय आहे.वरील वाक्यात उद्देश आणि विधेय याशिवाय जे शब्द आलेले असतात ते विधेय याचा विस्तार करतात.म्हणजे कोठे ,केव्हा,कसा या प्रकारे विस्तारित माहिती देतात.

       आपले विचार व्यक्त करताना ; वेगवेगळी वाक्य विस्कळीतपणे  मांडण्याऐवजी ती एकत्र करून  मांडल्याने व्यक्त होणाऱ्या विचारांमध्ये सुसंगतपणा येतो. वाक्यामधील फापट पसारा  न दिसता ते अधिक आटोपशीर  व आकर्षक वाटते.यासाठी वाक्याचे योग्य प्रकारे संकलन करता येणे ही एक कला आहे.

         आपण वाक्याची कोणत्या प्रकारे रचना केली आहे. त्या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेरीत आहे.त्यानुसार वाक्याचे रचनेवरून व अर्थावरून असे निरनिराळे प्रकार पडतात. बोलणाऱ्याच्या अथवा लिहिणाऱ्याच्या वाक्यातील अर्थावरून वाक्याचे खालील प्रकार पडतात.  

अर्थावरून वाक्याचे प्रकार

1.    विधानार्थी वाक्य  2.. प्रश्नार्थक वाक्य  3. आज्ञार्थी वाक्य   4. उद्गारार्थी विधानात  

            5.   होकारार्थी वाक्य  6.     नकारार्थी वाक्य    7.   इच्छार्थक  वाक्य                                                 

          वाक्यातील विधानावरून अथवा रचनेनुसार वाक्याचे खालील प्रकार पडतात.  


वाक्याच्या रचनेवरून वाक्याचे प्रकार  

    1.  केवलवाक्य      2. मिश्रवाक्य     3 . संयुक्तवाक्य                               

                            शब्दांच्या जाती कोणत्या पहा 

1)  1.  विधानार्थी वाक्य  : ज्या वाक्यात केवळ एक विधान केलेले असते .त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

 उदा. १. माझे वडील आज गावी गेले.

     २. आज शिवदर्शनास प्रचंड गर्दी होती.

2) प्रश्नार्थक वाक्य :  ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. 

उदा. १. तुम्ही पुण्याहून केंव्हा येणार आहात?

    २. तुझ्या शाळेस सुट्टी कधी आहेत?   

3)  आज्ञार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा ,आशीर्वाद ,प्रार्थना , विनंती ,किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. १. मुलांनो,नेहमी व्यायाम करा.

     २.परमेश्वरा ,त्यांना सदबुद्धी दे.

४) उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यातून तिरस्कार ,दु:ख,हर्ष,आश्चर्य,आनंद अशा भावनेचा उद्गार काढलेला असतो.त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. १. शाब्बास ! छान कामगिरी केलीस .

    २. अरेरे ! केवढा मोठा अपघात .

५) होकारार्थी वाक्य : ( करणरुपी ) ज्या वाक्यातील विधानात होकार असतो,त्या वाक्यास होकारार्थी वाक्य म्हणतात.

उदा. १. अपूर्व अभ्यास करतो. 

    २. तो नेहमी खरे बोलतो.

६) नकारार्थी वाक्य : ( अकरणरुपी ) ज्या वाक्यातील विधानात नकार असतो,त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा . १. रमेशचा मुलगा मुळीच  अभ्यास करत नाही.

       २. सुरेशचे अक्षर तसे वाईट नाही.

७) इच्छार्थी वाक्य : ज्या वाक्यातून मनातील इच्छा दर्शविली जाते त्या वाक्यास इच्छार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.  १. आज गार वारा सुटावा .

      २. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होवोत.

वाक्यांचे वाक्यातील विधानानुसार प्रकार

१)    केवलवाक्य  : कोणत्याही वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्या वाक्याला शुद्धवाक्य किंवा केवलवाक्य असे म्हणतात.

केवलवाक्य हे साधे,विधानार्थी,प्रश्नार्थी,आज्ञार्थी, होकारार्थी,अथवा नकारार्थी असे कोणत्याही प्रकारचे असू शकते.

उदा. १. शाम नेहमी सकाळी श्लोक वाचतो.

    २. स्नेहा गाणे गाते.

२) संयुक्त वाक्य : जेव्हा दोन स्वतंत्र वाक्य आणि, व, या  प्रधानत्वबोधक उभवान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. (संयुक्त वाक्यात दोन्ही वाक्ये स्वतंत्र व प्रधान असतात. ती ‘आणि’, ‘व’ या प्रधानत्वबोधक उभवान्वयी अव्ययाबरोबर पण, किंवा, अथवा अशा उभवान्वयी अव्ययांनी ही जोडलेली असतात.)

उदा. १. मी दररोज सकाळी फिरायला जातो किंवा योगा करतो.

    २. गड आला पण सिंह गेला.

३) मिश्र वाक्य : जेव्हा दोन वाक्य (एक प्रधान व एक गौण )

न्यूनत्वबोधक उभवान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

( न्यूनत्वबोधक उभवान्वयी अव्यये – पण,परंतु,कारण,की,म्हणून, सबब,यास्तव,शिवाय,जेव्हा-तेव्हा,जर-तर,जसे-तसे,जरी-तरी,ज्यावेळी-त्यावेळी इत्यादी )

उदा. १. जर विठ्ठलने प्रामाणिक अभ्यास केला असेल तर तो परिक्षेत हमखास पास होईल.

    २. गुरुजी म्हणाले की,पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

  मराठी समास व्याकरण  

 

Text Box: संजय शामराव मगदूम सर 
आदर्श विद्यालय आंबवडे 
ता.पन्हाळा जिल्हा कोल्हापूर 
मोबा.नं. ८७८८६२९१३३

 





هناك تعليق واحد:

Write a comment.