Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الثلاثاء، 22 يونيو 2021

अलंकार मराठी व्याकरण

 

अलंकार

        अलंकार या शब्दाचा अर्थ दागिनाअसा आहे. दागिने घातल्यामुळे माणसाच्या शरीराला शोभा येते.त्याच्या सौंदर्यात भर पडते.त्याचे रूप अधिक सुंदर,देखणे,प्रभावी बनत असते. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची.भाषा अधिक परिणामकारक बनावी किंवा चांगली दिसावी म्हणून भाषेत अलंकारीक शब्दाचा वापर करतो.

 उदा. तुझे चालणे मोहक आहे.असे न म्हणता चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचलेअशी रचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना उठावदार दिसून कानाला गोड वाटते. म्हणून ज्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.

अलंकाराचे प्रकार

अलंकार

शब्दालंकार                  अर्थालंकार


शब्दालंकार

जे अलंकार शब्दांवर,त्यातील अक्षरे वा स्वरासहित व्यंजन    समूहावर 

आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात.

                                                                                                        शब्दालांकाराचे उपप्रकार 

                                                                 

                                               अनुप्रास                                                                 यमक                                                   श्लेष

अनुप्रास अलंकार  : जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्मिती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

            उदा. १)  काकांच्या कामाची कागदपत्रे काकींनी कात्रीने कराकरा कापली.

         २)  पतिव्रतेच्या पुण्याईने पापी पुरुष

          परमेश्वरपदास पोहोचतो.

यमक अलंकार : जेव्हा पद्य चरणाच्या शेवटी,मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा यमकअलंकार होतो.

            उदा. १) सुसंगति सदा घडो,सुजनवाक्य कानी पडो |

               कलंक मतिचा झडो,विषय सर्वथा नावडो ||

                    २)अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवुनी जाती

                 दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसांची नाती

श्लेष अलंकार  : श्लेष याचा अर्थ मिळणे ,जुळणे ,भेटणे,मिठी मारणे असा आहे.

               जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यात एका शब्दाला एकाहून अधिक अर्थ जडलेले असतात तेव्हा श्लेष अलंकार होतो.           एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्याने शब्द चमत्कृती साधने , तेव्हा श्लेष अलंकार होतो.  

 उदा. १) मित्राच्या उदयाने मनाला आनंद होतो .

     १) मित्र सूर्य        २) मित्र  - स्नेही   ३)मित्र  - दोस्त  -सखा 

   २) श्रीकृष्ण नवरा मी नवरी  | शिशुपाल नवरा मी न वरी

        नवरा नवरी  , नवरा वरी

अर्थालंकार  : जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात अर्थालंकार म्हणतात .


अर्थालंकार प्रकार

 १ ) उपमा अलंकार  : जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दाखविलेला असतो तेव्हा उपमा अलंकारहोतो.

 उदा. १) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे|

       २) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी|

३) मुंबईची घरेमात्र लहान |कबुतराच्या खुराड्यांसारखी | 

  १.ज्याची तुलना करावयाची त्याला उपमेय म्हणतात

 २.ज्याच्याशी तुलना करावयाची त्याला उपमान म्हणतात  ३. दोन वस्तूंमधील सारखेपणाला साधारणधर्म  म्हणतात   ४. सारखेपणा  दाखविनाऱ्या शब्दाला साम्यवाचक शब्द                                                    म्हणतात     

२)उत्प्रेक्षा अलंकार : उपमेयहे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षाअलंकार होतो.

(या अलंकारात जणू,जणू काय,गमे,भासे,वाटे की असे साधर्म्यवाचक शब्द असतात.)

उदा.१) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

        २)खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरीवती  |

          देवदर्शना जणू चालल्या भाविक या तरुणी ||

३ )रूपक अलंकार : उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे,ती भिन्न नाहीत .असे वर्णन जिथे असते,तिथे रूपक हा अलंकार असतो. ( उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन असते.)

  उदा. १) लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा /

                आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

      २) बाई काय सांगो | स्वामीची ती दृष्टी |

           अमृताची वृष्टी  | मज होय |  

४ ) व्यतिरेक अलंकार : उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले  असेल तर व्यतिरेक अलंकार होतो.

उदा.   १) अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.

            २) कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान.

            ३) सावळा ग रामचंद्र | रत्नमंचकी झोपतो | त्याला पाहता लाजून | चंद्र आभाळी लोपतो ||

५ )स्वभावोक्ती अलंकार : एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे,प्राण्याचे,स्थळाचे वा अविर्भावांचे हुबेहूब वर्णन कवी करतो तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो.

  उदा. १) मातीत ते पसरले अतितम्य पंख

                  केले वरी उदर पांडुर निष्कलंक

                  चंचू तशीच उघडी पद लांबविले

                  निष्प्राण देह पडला श्रमही निमाले

            २) किती माझा कोंबडा ऐटदार

               चाल त्याची किती बरे डौलदार

              शिरोभागी सर्वथा तुरा हाले   

              जणू जास्वंदी फूल उमलले.

 ६ ) अतिशयोक्ती अलंकार :वाक्यातील मूळ कल्पना आहे त्यापेक्षा फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.

उदा.   १) वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित                     झाले.

   २) दमडिचं तेल आणलं,सासूबाईच न्हाण झाल,

     मामंजीची दाढी झाली,भावोजींची शेंडी झाली,

     उरलं तेल झाकून ठेवलं,लांडोरीचा पाय लागला,

     वेशीपर्यंत ओघळ गेला,त्यात उंट पोहून गेला

७) चेतनगुणोक्ती अलंकार : निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.

उदा.१) डोकी अलगद घरे उचलती | काळोखाच्या उशीवरूनी||

२) मंगल मंगल गीत म्हणे , अस्फुट रजनी मूकपणे ||

८ ) अनन्वय अलंकार : उपमेय हे उप्मानासार्खेच असते. त्याला दुसर्या क्ष्शीच उपमा देता येत नाही. असे वर्णन आले की अनन्वय अलंकार होतो.

उदा.   १) आहे ताजमहाल एक जगती तो तोच  त्याच्यापरी

            २) या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.

 ९ ) दृष्टांत अलंकार : दृष्टांत म्हणजे दाखला.एखाद्या गोष्टीच्या स्पष्टीकरणासाठी दुसऱ्या गोष्टीचा दाखला दिला जातो तेव्हा दृष्टांत अलंकार होतो.

उदा.   १)लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा |                 ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | 

२)न कळता पद अग्निवरी पडे | न करि दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे |सकल पातक भस्म करीतसे ||

१० ) अपन्हुती अलंकार  : एखादी वस्तू पाहूनही टी वस्तू नसून दुसरीच आहे म्हणजे उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन आले असता अपन्हुती अलंकार होतो.

उदा.   १) न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील.

            २) पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी

११ ) अर्थांतरण्यास अलंकार  : जेव्हा एखाद्या सामान्य गोष्टीच्या समर्थनार्थ एखादी विशिष्ट गोष्ट सांगितलेली असते किंवा एखाद्या विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ एखादा सामान्य सिद्धांत सांगितलेला असतो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो.

उदा.१) आली जरी कष्टदशा अपार , न टाकिती धैर्य तथापि थोर

    केला जरी पोत बळेचि खाले , ज्वाला तरी ते वरती उफाळे

२) वृक्ष फार लवती फलभारे , लोंबती जलद घेऊनि नीरे

     थोर गर्व न धरि विभवाचा , हा स्वभाव उपकार पराचा

१२ )अन्योक्ती अलंकार  : जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये अगर पद्यात दुसऱ्याला स्पष्टपणे न बोलता उद्देशून बोललेले असते तेव्हा अन्योक्ती अलंकार होतो.

उदा.   १) सरड्याची धाव कुंपनापर्यंत.

            २) सांबाच्या पिंडीत बससी 

अलंकार  सराव  प्रश्न  शिष्यवृत्ती परीक्षा      

هناك 3 تعليقات:

  1. बाई काय सांगो |स्वामीची ती दुष्टी अमृताची वृष्टी |मज होय. अलंकार ओळखा

    ردحذف

Write a comment.