Adarsh Education
- Home
- दहावी
- नववी
- आठवी
- शिष्यवृत्ती
- पुस्तके
- व्याकरण
- शासन निर्णय
- दहावी भूगोल
- Online Test
- भारत नकाशा 4
- ब्राझील नकाशा 5
- भारताती सरोवरे
- मानवी वस्ती
- भारत राजकीय नकाशा animation
- नकाशावाचन
- क्षेत्र भेट
- प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग १
- प्राकृतिक रचना व जलप्रणाली भाग २
- हवामान प्र.चाचणी
- भारतीय हवामान
- ब्राझील हवमान
- अर्थव्यवस्था आणि व्यवस्था
- आलेख वाचन'
- आलेख वाचन कसे करावे
- Submenu-5
- भूगोल प्र.5
- शैै.व्हिडिओ निर्मिती
- pdf Download
- Online Test
- सामान्यज्ञान
- मराठी बोधकथा
Adarsh Education
السبت، 31 يوليو 2021
ब्रेकिंग न्यूज दहावी विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका; मंडळाकडून नियोजन पूर्ण
दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिका; मंडळाकडून नियोजन पूर्ण
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (ssc result) 16 जुलै रोजी जाहीर केला होता, त्या निकालानंतर आता मंडळाकडून (education board) तब्बल 24 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना (students) आपल्या हातात गुणपत्रीका पडणार आहेत. या गुणपत्रिका वितरित (ssc marksheets) करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आज मंडळाकडून देण्यात आली. ( ssc students will get marksheets on ninth augast-nss9)दहावीची विद्यार्थ्यांना येत्या 9 ऑगस्टला शाळांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. शाळांनी कोरोनासंबंधित राज्य सरकारच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या सोईनुसार गुणपत्रिका वितरीत कराव्यात अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांना दिल्या आहेत.
الخميس، 29 يوليو 2021
CET : वाद न्यायालयात ! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
CET : वाद न्यायालयात ! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर,
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी (eleventh Admission) आयोजित केलेल्या सीईटीचा (CET) वाद न्यायालयात (court) पोहोचल्याने राज्यभरात ही सीईटी अडचणीत सापडली आहे. केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश या सीईटीत करण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिल्याने सरकारची (government) मोठी अडचण होणार असून यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (online admission) लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( eleventh CET in problems online Admission may go on waiting -nss91)तर दुसरीकडे न्यायालयात केंद्रीय मंडळांच्या पालक आणि इतर संघटनांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याने या दरम्यान सुरू असलेली सीईटीची नोंदणी अडचणीत येईल की काय अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आह. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि त्यानंतर मागील आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
मराठी म्हणी अर्थासह स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
मराठी म्हणी
शैक्षणिक व्हिडिओ
पाहणेसाठी - Click
here
(1) अति
तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी नुकसान कारकच
ठरतो.
(2)
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा - जो मनुष्य फार शहाणपणा करायला
जातो, त्याचे काम मुळीच होत नाही.
(3) अडला
हरी गाढवाचे पाय धरी - एखादया बुद्धिमान,
सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन
माणसाची विनवणी करावी लागते.
(4) असतील
शिते तर जमतील भूते - एखादया माणसाकडून फायदा होणार असला की, त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
(5)
आगीतून निघून फुफाट्यात पडणे - लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात
सापडणे.
(6) आधी
पोटोबा, मग विठोबा- प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म, परमार्थ
करावा.
(7) आपलेच दात, आपलेच ओठ- आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे.
(8) आयत्या
बिळावर नागोबा - एखादयाने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा
घेण्याची वृत्ती असणे.
व्हिडीओ
पाहणेसाठी click
here
(9) आंधळा
मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त
फायदा होणे.
(10) आंधळं
दळतं, कुत्रं पीठ खातं - एकाने काम करावे आणि दुसऱ्याने
त्याचा फायदा घ्यावा.
(11) इकडे
आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
(12)
उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता बोलणे,
13) उथळ
पाण्याला खळखळाट फार - अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.
14) ऊस गोड
लागला म्हणून मुळापासून खाऊ नये- कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या
चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
15) एक ना
धड, भाराभर विध्या - कोणतेही एक काम पूर्ण न करता, अनेक कामे एकामागून एक करायला घेणे.
16) काखेत
कळसा, गावाला वळसा - जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
17)
कामापुरता मामा - गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस
18)
खाण तशी माती- आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
वाक्प्रचार
व्हिडीओ पाहणेसाठी -
click
here
(19) गाढवाला गुळाची चव काय? - ज्याला एखादया गोष्टीचा गंध नाही; त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
(20) गरज सरो,
वैदय मरो- एखाच्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध
ठेवणे व गरज संपली की, त्याला ओळखही न दाखवणे.
(21) गर्जेल तो
पडेल काय? - केवळ बाता करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही.
(22) गोगलगाय अन् पोटात पाय - बाहेरून गरीब
दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपण करणारी व्यक्ती.
(23) घरोघरी
मातीच्या चुली -एखादया बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीय परिस्थिती असणे
(24) चार दिवस
सासूचे, चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला केव्हा तरी परिस्थिती अनुकूल होतेच.
(25) चोर सोडून
संन्याशाला फाशी - खऱ्या अपराधी माणसाला
सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
(26) चोराच्या
मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय,
अशी सारखी भीती वाटत असते
(27) चोरावर मोर -
एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर मात करणे
(28) झाकली मूठ
सव्वा लाखाची - गुप्त ठेवण्याजोगी बाब गुप्तच ठेवावी; व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
(29) ताकापुरती
आजीबाई - आपले काम होईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
(30) तळे राखील, तो पाणी चाखील - ज्याच्याकडे
एखादे काम सोपवलेले असेल; त्यातून तो स्वत:चा काही तरी फायदा उठवणारच.
(31) थेंबे थेंबे तळे साचे - दिसण्यात क्षुल्लक
वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो.
(32) दगडावरची रेघ
– खात्रीची गोष्ट असणे.
(33) दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा
लहान संकट सुसह्य वाटणे.
(34) दिव्याखाली अंधार - मोठ्या माणसाच्या
ठिकाणीदेखील काही दोष असतातच
(35) दुरून डोंगर
साजरे - कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यानंतर तिचे खरे स्वरूप
कळते.
(36) नाचता येईना
अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम करता येत नसेल,
तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरिता संबंधित गोष्टीत दोष दाखवणे
(37) नाव मोठं,
लक्षण खोट - बाहेरचा भपका मोठा असणे; पण कृतीच्या नावाने मात्र शून्य असणे.
(38) नाकापेक्षा
मोती जड – मालकापेक्षा नोकराची मिजास अधिक.
(39) पळसाला पाने
तीनच - सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे
(40) पाचामुखी
परमेश्वर - पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे
(41) पालथ्या घड्यावर
पाणी - केलेला उपदेश निष्फळ ठरणे
(42) पी हळद नि हो
गोरी – कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.
(43) पुढच्यास ठेच
मागचा शहाणा - दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून काही बोध घेणे व सावधपणे वागणे.
(44) बळी तो कान
पिळी - बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो (45) बुडत्याचा पाय खोलात माणसाची
अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनी होऊ लागते.
(46) बुडत्याला काडीचा
आधार - घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते.
(47) मुलाचे पाय
पाळण्यात दिसतात - लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुण-दोषांचे दर्शन होते.
(48) यथा राजा तथा
प्रजा - प्रमुख माणसाच्या आचारविचाराप्रमाणेच त्याच्या अखत्यारीतील इतर माणसांचे आचारविचार
असतात.
(49) लहान तोंडी
मोठा घास - आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे.
(50) वरातीमागून
घोडे- एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीची साधने जुळवणे व्यर्थ असते.
(51) वासरांत
लंगडी गाय शहाणी - मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो.
(52) हत्ती गेला,
शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा
राहिला.
(53) हातच्या काकणाला
आरसा कशाला? – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
शैक्षणिक
व्हिडिओ पाहणेसाठी - https://bit.ly/3eRhoEw
Sanjay
S. Magdum
Adarsh Education 8788629133
الثلاثاء، 27 يوليو 2021
अकरावी (CET)सीईटीची तयारी करताय ?मग घाबरू नका . या ट्रिकचा उपयोग निश्चित तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.
अकरावी (CET)सीईटीची तयारी करताय ?मग घाबरू नका . या ट्रिकचा
उपयोग निश्चित तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.
दहावी परीक्षेचा ताण संपला आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्या अगोदरच अकरावी प्रवेश परीक्षा CET जाहीर झाली .त्यामुळे आवडत्या कोर्स किंवा कॉलेजला प्रवेश घेणे अवघड जाऊ शकते . पण विद्यार्थी मित्रानो घाबरू नका .आपणास सीईटीचा सामना करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स ( ट्रिक ) दिल्या आहेत त्याचा उपयोग करा.निश्चित या परीक्षेत उपयोग होईल .
दहावी परीक्षेचा ताण संपला आणि उत्तीर्ण झाल्याचा
आनंद साजरा करण्या अगोदरच अकरावी प्रवेश परीक्षा CET जाहीर झाली .त्यामुळे आवडत्या
कोर्स किंवा कॉलेजला प्रवेश घेणे अवघड जाऊ शकते . पण विद्यार्थी मित्रानो घाबरू
नका .आपणास सीईटीचा सामना करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स ( ट्रिक ) दिल्या आहेत
त्याचा उपयोग करा.निश्चित या परीक्षेत उपयोग होईल .
थोडे हेंही महत्वाचे
· अकरावी
प्रवेशांसाठी यंदा ऐच्छिक सीईटी ( CET )
· समजून
घ्या कशी करावी तयारी सीईटी ची तयारी
· गोंधळून
न जाता थोडा संयम ठेवा .
· स्वत:वर
विश्वास ठेवा ,तुम्हाला आवडत्या कोर्सलाच प्रवेश घ्या.
या वर्षी सोनलला दहावीत ९९.००% तर अपूर्वला दहावीत
९७.५% टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करायचा सोडून, पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करावी लागत आहे. म्हणून ते थोडे हिरमुसलेले आहेत. अशी परिस्थिती अनेकांची या
वर्षी झाली आहे. बोर्डाची परीक्षा नसल्याचा आनंद होताच. पण आता अकरावी प्रवेशासाठी
राज्यभरात सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार, ह्या
विचाराने ते नाराज झाले आहेत. मनासारखे मार्क मिळूनदेखील प्रवेश परीक्षा द्यावी
लागणार आहे याचा ताण आणि त्रास अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. आणि परीक्षा म्हटले
की तयारी ही लागणारच. जे वेगळ्या बोर्डातले आहेत, त्यांना
एसएससी बोर्डचा अभ्यासदेखील करावा लागणार आहे, हा त्यात अजून
एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
दहावीचा ताण पूर्णपणे संपलेला, उत्तीर्ण झाल्याचा आनंद, आवडत्या कोर्ससाठी प्रवेश,
कॉलेजला जाण्याचा उत्साह ह्या तीक्षेची तयारी करणं अवघड जाऊ शकते. सीईटी
(cet)चा सामना करण्यासाठी आपल्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स ( ट्रिक) देत
आहे.
* परीक्षेची
पद्धत किंवा मार्किंग सिस्टिमबद्दल कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य
अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती घ्या.
* अभ्यासाचे फक्त चार विषय आहेत . _ गणित ,विज्ञान,
समाजशास्त्र, इंग्रजी
हे जाणून घ्या आणि अभ्यास करा ,यशस्वी
व्हा .
* विषय नुसार क्वेशन बँकचा वापर करा;त्यात दिलेल्या MCQ सोडवा .
* स्वतःचे विश्लेषण करा. स्वत:चे सामर्थ्य आणि सोपे
/ वेळ घेणारे विषय समजून घ्या.
* आदर्श वेळापत्रक तयार करा आणि त्याचा वापर करा.
* जरी आधी विषय वाचले आणि समजले असतील तरी उजळणी करा.
* नवीन संकल्पना अस्पष्ट असल्यास, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.
* जरी आपल्याला ती पुनरावृत्ती वाटत असेल तरी, परीक्षेसाठी लक्ष केंद्रित करण्याचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.
* तुम्ही ऑनलाइन उपलब्ध अभ्यासाच्या साहित्याचा
संदर्भ घेऊ शकता.
* परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या.
* स्वतःच्या तयारीबद्दल अतिआत्मविश्वास बाळगू नका.
* चांगले मार्क मिळाले म्हणून सीईटीच्या तयारीकडे
दुर्लक्ष करू नका
* अभ्यासासाठी विशिष्ट तास वेळ द्या. छोटे ब्रेक
घ्या आणि नंतर आपली तयारी पुन्हा सुरू करा.
* अभ्यासात काही अडथळे आल्यास आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.
* परीक्षेचा ताण घेऊ नका .
निकालाच्या आनंदात वाहवत जाऊ नका, मनावर थोडा संयम ठेवून परीक्षेची तयारी करा. तुमच्याकडे अद्याप वेळ
असल्याने परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते, हे
लक्षात असू दे. प्रथमच सीईटी आयोजित केले जात आहे. म्हणून चिंताग्रस्त आणि
गोंधळलेले असणे साहजिक आहे. परंतु यामुळे आपल्या तयारीवर परिणाम होऊ देऊ नका. जरी
तुम्ही एक विशिष्ट कोर्स / करिअर घ्यायचे ठरवले असले तरीही, प्रवेशासाठी
ही परीक्षा महत्त्वाची आहे, हे विसरू नका. जरी तुम्हाला अभ्यासाची
पुनरावृत्ती करण्यास कंटाळा आला असला, तरीही विसरू नका की या
परीक्षेतील कामगिरी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची
शक्यता वाढविण्यास मदत करेल.
आपणास
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
الاثنين، 26 يوليو 2021
NMMS परीक्षा निकाल जाहीर सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन
NMMS परीक्षा निकाल जाहीर
सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन
निकाल पहाण्यासाठी खालील लिंकला टच करा .
https://nmms.mscescholarshipexam.in//NMMS2020ResultLive
الأحد، 25 يوليو 2021
मराठी व्याकरण स्मार्ट pdf
संपूर्ण मराठी व्याकरण स्मार्ट pdf
शालेय अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करणेसाठी खालील व्याकरण प्रकाराला टच करा ,आणि करा तयारी घरच्या घरी
السبت، 24 يوليو 2021
मराठी साहित्य व साहित्यप्रकार : साहित्यिक व टोपणनावे
मराठी साहित्य व साहित्यप्रकार : साहित्यिक व टोपणनावे
मराठी साहित्यातील प्रकार
पद्य साहित्य -
अभंग ओवी श्लोक, गौळणी-भारुडे पोवाडे -लावणी,
कविता, नाट्यगीते
गद्य साहित्य -
निबंध ललित लेख, कथा, कादंबरी, नाटक प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र)
संपूर्ण प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे लेखन वाचण्यासाठी किंवा (pdf
)डाऊनलोड करणेसाठी
खालील ठिकाणी डब्बल क्लिक करा .
1. काही कधी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे
(1) कृष्णाजी केशव दामले – केशवसुत (2) राम गणेश गडकरी- गोविंदाग्रज, बाळकराम
(3) वि. वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज (4) व्यंबक बापूजी ठोमरे- बालकवी
5) शंकर केशव कानेटकर – गिरीश (6) प्रल्हाद केशव अत्रे- केशवकुमार
(7) आत्माराम रावजी देशपांडे –अनिल (8) दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
(9) काशिनाथ हरी मोडक-माधवानुज (10) विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
व्हिडिओ पाह्नेसाठी येथे क्लिक करा .
الجمعة، 23 يوليو 2021
समानार्थी शब्द शिष्यवृत्ती परीक्षा
समानार्थी शब्द
अभिनेता – नट
अश्व – घोडा ,तुरग,वारू,तुरंगम,वाजी
अपराध
–गुन्हा
अग्नि
– विस्तव,वन्ही ,पावक ,अनल,आग
अत्याचार
– जुलूम,अन्याय
अचल
– पर्वत,स्थिर,शांत
अपाय
– इजा,त्रास
अमृत
– संजीवनी,सुधा,पीयूष
अवचित
– अचानक,एकदम
अवर्षण
– दुष्काळ
अमित – अगणित,असंख्य,अमर्याद
अस्त – मावळणे
अविरत
– अखंड,सतत
अर्थ
– मतलब,उद्देश,हेतू,भावार्थ,तात्पर्य,भाव
अक्षय – न संपणारा
अही
– भुजंग,सर्प,साप
अवहेलना
– अपमान
अनर्थ
– संकट,अरिष्ट
अनुरक्ता
– प्रेमात
पडलेली
अभियान
– मोहीम
अभिषेक
– अभिशेष,अभिषव
अभ्यास
– सराव,व्यास…
अश्व – घोडा ,तुरग,वारू,तुरंगम,वाजी
अपराध
-गुन्हा
अग्नि – विस्तव,वन्ही ,पावक ,अनल,आग
अत्याचार
– जुलूम,अन्याय
अचल – पर्वत,स्थिर,शांत
अपाय
– इजा,त्रास
अमृत
– संजीवनी,सुधा,पीयूष
अवचित – अचानक,एकदम
अवर्षण
– दुष्काळ
अमित – अगणित,असंख्य,अमर्याद
अस्त
– मावळणे
अविरत – अखंड,सतत
अर्थ – मतलब,उद्देश,हेतू,भावार्थ,तात्पर्य,भाव
अक्षय – न संपणारा
अही – भुजंग,सर्प,साप
अवहेलना
– अपमान
अनर्थ
– संकट,अरिष्ट
अनुरक्ता – प्रेमात पडलेली
अभियान – मोहीम
अभिषेक
– अभिशेष,अभिषव
अभ्यास
– सराव,व्यासंग,परिपाठ
अरण्य
– वन,रान,कानन,जंगल,विपिन,अटवी
अभिनय
– हावभाव,अंगविक्षेप
अहंकार – घमेंड,गर्व
आगत्याने
– स्वागतशील
दृष्टीने
अर्जुन – पार्थ,भारत,किरीट,फाल्गुन,धनंजय
आई –
माय,माऊली,माता,जननी,जन्मदात्री,मातोश्री
आमूलाग्र – मुळापासून
शेंड्यापर्यंत
आरसा – दर्पण
आकांक्षा
– इच्छा
आण
– शपथ
आकाश
– नभ,गगन,अंबर,आभाळ,खग,व्योम,तारांगण,अवकाश,अंतरिक्ष
आयुष्य
– जीवन
आळशी
– ऐदी,कामचुकार,सुस्त,मंद,निरुद्योगी,उठाळ,आळसट
आनंद
– आमोद,हर्ष,तोष,मोद,संतोष,प्रमोद
आस्था
-जिव्हाळा,आदर,अगत्य,आपुलकी
आश्चर्य
– अचंबा,नवल,विस्मय
आज्ञा – हुकूम,आदेश
आपत्ती
– संकट
आकाशवाणी
– नभोवाणी
आहार – भोजन,खाद्य
आमरण
– मरेपर्यंत
आसन
– बैठक
आठवण – स्मरण,स्मृती
आस
– इच्छा,मनीषा
आसक्ती
– हव्यास,लोभ
अंग – तनू,काया,शरीर,देह
अंगार
– निखारा
अंगना – स्त्री
अंत
– अखेर,शेवट
अंतरिक्ष
– अवकाश
इहलोक
– मृत्यूलोक
इशारा
– खूण,सूचना
इंदू
– चंद्र
इंद्र – देवेंद्र ,सुरेन्द्र
इच्छा
– मनीषा,अपेक्षा,आशा,वासना,आराजू,आकांक्षा
ईश्वर
– प्रभू,परमेश्वर,देव,ईश,अलक्ष,अलक,आनंदघन
उणीव – न्यून,न्यूनता,कमतरता
उपवन
– बाग,बगीचा,उद्यान,वाटिका
उदर
– पोट
उतारू
– यात्रिक,प्रवासी. यात्रेकरू
उदास – खिन्न,दु:खी
उपनयन – मुंज
उंट
– उष्ट्र,उष्टर
उत्कर्ष
– भरभराट,वाढ,संपन्नता
उपद्रव
– छळ,त्रास
ऊर्जा
–शक्ती
ऊन
– ऊर्ण,लोकर
ऋषि
– साधू,मुनी
एकजूट – ऐक्य,एकता,एकी
ऐतोबा
– काम न
करणारा
ऐश्वर्य
– वैभव,श्रीमंती
औक्षण
– ओवाळणे
कष्ट
– मेहनत,श्रम
करमणूक – मनोरंजन
कट
– कारस्थान
कटी
– कंबर
कृष्ण
– मुरलीधर,देवकीपुत्र,मुरारी,कन्हैया,वासुदेव,कान्हा,
कठोर
– निर्दय,निष्ठुर
कनक
– कांचन,सोने,सुवर्ण,हेम
कमळ
– अंबुज,पंकज,राजीव,पुष्कर,कुमुदिनी,सरोज,पद्म,नलिनी,नीरज,अब्ज
कपाळ
– भाल,लल्लाट,मस्तक,कपोल,अलिक,निढळ
काठ
– किनारा,तीर,तट
कासव
– कूर्म,कच्छ,कमठ,कच्छप
काळजी – आस्था,फिकीर,कळकळ,चिंता
कान
– श्रवण,श्रोत्र,कर्ण
काळोख
– तिमिर,अंधार,तम
कावळा
– एकाक्ष,काक,वायस,काऊ
काष्ठ
– लाकूड
किल्ला
– तट,दुर्ग,गड
किंकर
– अनुचर,सेवक,दास,भृत्य,
किरण
– रश्मी,कर,अंशु,मयुख
किमया
– चमत्कार,जादू
क्रीडा
– मौज,खेळ,विहार,विलास,मनोरंजन
कुटी
– झोपडी
कुरूप
– बेढब,विद्रूप,आकाररहित
कोकीळ
– पिक,कोयल,कोगुळ
कृपण
– चिक्कू ,कंजूष,हिमटा,खंक,कोमटा
कृश
– हडकुळा
खडक
– पाषाण ,खूप मोठा दगड
खटाटोप – मेहनत,प्रयत्न,धडपड
खल
– दुष्ट,नीच,दुर्जन
खळ
– दुर्जन
खजिना
-भांडार,तिजोरी,द्रव्य,कोश
खग
– विहग,पक्षी,द्विज,अंडज,शंकुट
खड्ग
– तलवार
खूण
– निशाणी,चिन्ह,संकेत
खून
– हत्या,वध
खेडे
– ग्राम,गाव
खंत
– दु:ख,खेद
ख्याती
– कीर्ती,प्रसिद्धी
गवई
– गायक
ग्रंथ
– पुस्तक
गरज
– निकड,आवश्यकता,जरूरी
गनीम – अरी,शत्रू
गर्व
– अहंकार
गरुड
– खगेंद्र,द्विजराज,वैनतेय,खगेश्वर
गणपती - लंबोदर,गौरीसुत,गजानन,विनायक,एकदंत,प्रथमेश,गजवदन,गौरीनंदन,गणेश,विघ्नहर्ता,गणराय,चिंतामणी
गरुड
– द्विजराज,वैनतेय,खगेंद्र
गृहिणी
– घरधनीण
गर्दी
– खच,दाटी
गाणे
– गीत
गाय
– गो,धेनू,गोमाता
गोष्ट
– कहाणी,कथा
गौरव
– सत्कार,सन्मान,अभिनंदन
गंध – परिमळ ,वास
घर
– गृह,सदन,निवास,निकेतन,आलय,भवन,धाम
घोडा
– अश्व,हय,तुरग,वारू
घास
– कवळ,ग्रास
चेहरा
– मुख,तोंड,आनन,वदन
चौफेर
– सर्वत्र,चहूकडे
चंद्र
– शशांक,शशी,राजनीनाथ,इंदू,सुधाकर,सोम,हिमांशु,शुधांशु,निशानाथ,विधू
चांदणे
– ज्योत्स्ना,चंद्रिका,कौमुदी,
चवताळणे
– रागावणे,चिडणे
छडा
– आवड,नाद
छिद्र
– भोक
जरा – म्हातारपण
जरब
– दबदबा,दरारा,धाक,दहशत,वचक
जयघोष
– जयजयकार
जमीन
– भू,भूई,भूमी
जिन्नस
– पदार्थ
जीवन
– पाणी,आयुष्य,जल
जिव्हाळा
– प्रेम,माया,ममता
जीर्ण
– जुने
ज्येष्ठ
– वरिष्ठ,मोठा
जल
– जीवन,पाणी,नीर,सलिल,उदक
झाड
– तरु,वृक्ष,द्रुम,पादप,शाखी,अगम
झुंबड
– रीघ,गर्दी,थवा,दाटी,खच
झुंज
– संग्राम,लढा,संघर्ष
झेंडा – निशाण,ध्वज,पताका
झोका
– हिंदोळा
टंचाई
– कमतरता
ठसा
– खूण
ठग
– लुटारू
ठक
– लबाड
ठेकेदार
– मक्तेदार,कंत्राटदार
डोके
– शिर,मस्तक,माथा,शीर्ष
डोंगर –नग,पर्वत,अचल,शैल
डोळे -अक्ष,चक्षू,नेत्र,लोचन,नयन,आवाळू
ढग
– जलद,मेघ,अंबुद,अभ्र,पयोद
ढीग
– रास
तलाव
– सारस,कासार,तळे,तटाक,तडाग,सरोवर
त्वेष
– आवेश,स्फुरण
तरुण
– युवक,जवान
तारुण्य
– ज्वानी,यौवन,जवानी
ताकद
– बल,शक्ती
तोंड – तुंड,मुख,आनन,वदन
तारे
– चांदण्या,नक्षत्रे,तारका
तारू
– गलबत,जहाज
तलवार
– खड्ग,समशेर
तिमिर
– काळोख,अंधार
तृष्णा
– लालसा,तहान
तृण
– गवत
तुरुंग
– कैदखाना,कारागृह,बंदीखाना
थंड
– गार,शीतल,शीत
थवा
– घोळका,गट,समुदाय,जमाव,चमू
दंत
– दात
दंडवत
– नमस्कार
दास – नोकर,चाकर
दारा
– पत्नी,बायको
दानव
– दैत्य,असुर,राक्षस
दागिना
– भूषण,अलंकार
दिन
– वासर,दिवस,अह,वार
दीन
– गरीब
दुजा
– दुसरा
दुनिया – जग
दुर्दशा
– दु:स्थिति,दुरवस्था
दुर्धर – गहन,कठीण
दूध
– दुग्ध,पय,क्षीर
दैत्य
– असुर,राक्षस,दानव
देव
– ईश्वर,ईश,सुर,परमेश,अमर,परमेश्वर
दैन्य
– दारिद्रय
देऊळ
– देवालय,राऊळ,मंदिर
धरती – पृथ्वी,वसुंधरा,धरणी,क्षोणी,वसुधा,धरित्री,मही,भूमी,रसा,अवनी
धवल – शुभ्र,पांढरे
धनुष्य
– कोदंड,चाप,तिरकमठा,धनू,कमटा,कार्मुक
धन
– संपत्ती,पैसा,वित्त,संपदा,द्रव्य,दौलत
धूर्त
– भांडखोर,लबाड,लुच्चा,चलाख,अरकाट,लफंगा,कावेबाज
नगर – पूर,पुरी,शहर
नजराणा
– उपहार,भेट
नवनीत
– लोणी
नवरा
– वल्लभ,पती,भ्रतार,कांत,धव,भर्ता
नमस्कार
– वंदन,प्रणिपात,नमन,अभिवादन
नदी
– तटिनी,सरिता,जीवनदायिनी,तरंगिणी
नृप – भूपाळ,भूपती,भूप,राजा,महीपती,नरेश
नाथ – स्वामी,धनी
निष्णात
– प्रवीण,तरबेज
नारळ
– नारिकेल,श्रीफळ
निर्जन
– ओसाड
निर्झर
– झरा
निर्वाळा
– खात्रीपूर्वक
निर्मळ
– स्वच्छ
नीच
– अधम,तुच्छ,चांडाळ
नेता
– पुढारी,नायक
नैपुण्य
– कौशल्य
नोकर
– दास,सेवक,चाकर,उलिंग,आर्यिक
नौदल – आरमार
पशू – जनावर,श्वापद,प्राणी
पती
– भ्रतार,नवरा
पक्षी
– पाखरू,खग,द्विज,विहग,अंडज,विहंग
पत्नी – बायको,कांता,अर्धांगिनी,दार,भार्या,कलत्र,जाया पर्वत – अद्री,गिरी,नग,अचल,शैल
परिमल – सुगंध,सुवास
पाणी – पय,जल,उदक,नीर,वारी,जीवन,सलील,अंबू तोय
पारंगत – तरबेज,निपुण
पान
– पत्र,पल्लव,पर्ण
पार्वती
– उमा,भवानी,गौरी,कन्याकुमारी,दुर्गा,काली
पाय – पाद,पद,चरण
पारिपत्य – शिक्षा,दंड,पराभव
पुरुष – मर्द,नर
पुढारी – नेता,नायक,धुरीण,अग्रणी
पूजा – सेवा,अर्चना,अर्चा
पैसा – दाम
पोपट – रावा,शुक,राघू,कीर
पोरका – आई-बाप नसलेला,निराधार
पंक – चिखल
पंक्ती – ओळ,पंगत,रांग
पंडित – विद्वान,शास्त्री,बुद्धिमान
प्रकाश – तेज,उजेड
पृथ्वी
– धरणी,धरती,वसुंधरा,रसा,भू,धरा,क्षमा,मही,भूमी,धरित्री
प्रजा – रयत,लोक,जनता
प्रपंच – संसार
प्रतीक – खूण,चिन्ह
प्रगल्भ – शहाणा,प्रौढ,गंभीर
प्रासाद – वाडा,मंदिर
प्रताप – शौर्य,पराक्रम
प्रघात – पद्धत,चाल,रिवाज,रीती
प्रवीण – कुशल,पटू,निपुण,हुशार,निष्णात,तरबेज
प्राचीन
– पुरातन,जुनाट,पूर्वीचा
प्रात:काळ
– उषा,पहाट,सकाळ
प्रेम – लोभ,स्नेह,माया,प्रीती,अनुराग
पर्वत – नग,गिरी,अचल,शैल,अद्री
फूल – सुमन,सुम,कुसुम,पुष्प
बहर – सुगी,हंगाम
बक – बगळा
बळ – शक्ती,जोर,ताकद,सामर्थ्य
बाग – उद्यान,उपवन,बगिचा
बाप – पिता,वडील,तात,जन्मदाता,जनक
बाण – शर,तीर,सायक
बिकट – कठीण,अवघड
बेडूक – दर्दुर,मंडुक
ब्राह्मण
– द्विज,विप्र
ब्रह्मदेव – विधी,चतुरानन,प्रजापती,कमलासन,ब्रह्मा,विरंची
बांधेसूद – सुडौल,रेखीव
बेढब – बेडौल
बैल – पोळ,खोंड,वृषभ
बंधन – मर्यादा,निर्बंध
बंधू – भ्राता,भाऊ
ब्रीद – प्रतिज्ञा,बाणा
भगिनी – बहीण
भरवसा – खात्री,विश्वास
भरभराट – चलती,समृद्धी,चलती
भार – ओझे
भाऊ – भ्राता,सहोदर,बंधू
भान
– जागृती,शुद्ध
भांडण – झगडा,कलह,तंटा
भाऊबंद – सगेसोयरे,नातेवाईक,आप्त
भांडखोर – कलभांड,कलांट,कळाम,कलागती,कलाझंगडी
भुंगा – भृंग,अलि,भ्रमर,मिलिंद,मधुप
भू –
धरा,भूमी,जमीन,धरित्री,धरणी
भेद
– भिन्नता,फरक
भेकड – भीरु,भ्याड,भित्रा
महिमा – मोठेपणा,थोरवी,माहात्म्य
मनसुबा – विचार,बेत
मकरंद – मध
महा – मोठा,महान
मलूल – निस्तेज
मंदिर – देवालय,देऊळ
मयूर – मोर
मत्सर – असूया,द्वेष
मार्ग – वाट,सडक,पथ,रस्ता
माणूस – मनुज,मनुष्य,मानव
मानव – माणूस,नर,मनुष्य,मनुज
मित्र –सखा,स्नेही,दोस्त,सोबती,सवंगडी,
मासा – मत्स्य,मीन
मित्र – स्नेही,सोबती,दोस्त,साथीदार,सवंगडी
मुलामा – लेप
मुलगा – आत्मज,सुत,लेक,पुत्र,नंदन,तनय,तनुज
मुलगी – आत्मजा,तनया,पुत्री,दुहिता,सुता,कन्या,तनुजा,नंदिनी
मूषक – उंदीर
मेष – मेंढा
मोहिनी – भुरळ
मौज – गंमत,मजा
मंगल – पवित्र
याचक – भिकारी
यज्ञ – मख,याग,होम
यातना – दु:ख,वेदना
यान
– अंतराळवाहन युवती – तरुणी
युद्ध
– लढाई,रण,संग्राम,समर,संगर
रक्त – असु,रुधिर,शोणित,असुत
रात्र – यामिनी,रजनी,निशा,रात
रस्ता – वाट,पथ,मार्ग
रागीट – संतापी,कोपी,कोपिष्ट
रुक्ष – नीरस,कोरडे
राजा – भूपती,नरेश,नरेंद्र,भूपाल,नृप
राग – क्रोध,रोष,त्वेष,संताप,कोप
रयत – प्रजा,जनता
रोष – राग
रंक – गरीब
लढा – संघर्ष,लढाई
लाज – भीड,शरम
लक्ष्मी – कमला,रमा,वैष्णवी,श्री,इंदिरा
· लाडका
– आवडता
· लावण्य
– सौंदर्य
· वर
– भ्रतार,नवरा,पती
· वल्लरी
– लता,लतिका,वेल
· वंदन
– प्रणाम,नमन,नमस्कार,प्रणिपात,अभिवादन
· वर्षा
– पावसाळा,पाऊस
· वचक
– दरारा,धाक
· वस्त्र
– वसन,कपडा,अंबर,पट
· वत्स
– बालक,वासरू
· वारा
– वात,वायू,मरुत,अनिल,समीर,पवन,मारुत,समीरण,हवा
· वासना
– इच्छा
· वाली
– कैवारी,रक्षणकर्ता
· वानर
– मर्कट,कपी,शाखामृग,माकड,
· विलंब
– उशीर
· विष्णू
– रमेश,रमापती,मधुसूदन,चक्रपाणि,नारायण,केशव,हृषीकेश,गोविंद,पुरुषोत्तम
· विमल
– निर्मळ,निष्कलंक
· विवंचना
– चिंता,काळजी
· विद्रूप
– कुरूप
· विनय
– नम्रता
· विस्तृत
– विस्तीर्ण,विशाल
· विस्मय
– नवल,आश्चर्य
· विहार
– सहल,क्रीडा,भ्रमण
· विलग
– अलग,सुटे
· विषण्ण
– कष्टी,खिन्न
· वीज
– चंचला,सौदामिनी,चपला,तडिता,विद्युल्लता,विद्युत
· व्यथा
– दु:ख
· व्रण
– क्षत,खूण
· व्याकूल
– कासावीस,दु:खी
· शव
– प्रेत
· शंकर
-महेश,महादेव,निळकंठ,रुद्र,सांब,महेश,भालचंद्र,त्रिनेत्र,दिगंबर,शिव
· शक्ती
– जोर,बळ,सामर्थ्य,ताकद,ऊर्जा
· शर
– तीर,बाण,सायक
· शत्रू
– रिपू,अरी,वैरी,दुश्मन
· शेज
– अंथरूण,शय्या,बिछाना
· शिकारी
– पारधी
· शिक्षक
– गुरु,मास्तर,गुरुजी
· शीण
– थकवा
· शेतकरी
– कृषीवल,कृषक
· शेष
– अनंत,वासुकी
· शिकस्त
– पराकाष्ठा
· सज्जन
– संत
· सह्याद्री
– सह्याचाल,सहयगिरी
· समाधान
– संतोष,आनंद
· समुद्र
– सिंधू,रत्नाकर,सागर,जलनिधी,जलधी,पयोधी,उद्धी,,अंबुधी
· समय
– वेळ
· सकल
- अखिल,समस्त,सर्व,सगळा
· सनातनी
– कर्मठ
· साप
– भुजंग,सर्प,अही
· संहार
– विनाश,नाश,विध्वंस,सर्वनाश
· स्वच्छ
– साफ,निर्मळ,नीटनेटका
· स्तुती
– कौतुक,प्रशंसा
· साधू
– संन्यासी
· साथ
– संगत,सोबत
· सुगम
– सोपा,सुकर,सुलभ
· सुरेल
– गोड
· सोने
– हिरण्य,कांचन,कनक,हेम,सुवर्ण
· सुंदर
– छान,देखणे,सुरेख,मनोहर,रम्य,रमणीय
· सीमा
– मर्यादा,शीव,वेस
· सेवक
– नोकर,दास
· सैन्य
– दल,फौज
· संघ
– चमू,समूह,गट
· संशोधक
– शस्त्रज्ञ
· संदेश
– निरोप
· संघर्ष
– टक्कर,कलह,झगडा,भांडण
· संकल्प
– मनसुबा,बेत
· स्वामी
– मालक,धनी
· स्वेद
– घर्म,घाम
· सूर्य
– भास्कर,रवी,आदित्य,भानू,दिनमणी,दिनकर,वासरमणी,सविता,मित्र,मार्तंड,चंडांशू
· संग्राम
– समर,संगर,लढाई,युद्ध
· संशय
-शंका
· संहार
– विनाश,नाश,सर्वनाश
· सिंह
– केसरी,वनराज,मृगेंद्र,पंचानन,मृगराज,
· स्त्री
– वनिता,महिला,नारी,कामिनी,ललना,अबला
· हताश
– निराश
· हरिण
– कुरंग,सारंग,मृग
· हत्ती
– कुंजर,गज,नाग,सारंग
· हात
– हस्त,पाणि,कर,बाहू,भुजा
· हिम
– बर्फ
· हिरमोड
– विरस
· हिंमत
– धाडस,धैर्य
· ह्रदय
– अंत:करण,हिरित,अंतर
· हुशार
– चाणाक्ष,चतुर,चलाख,कलमतारश,कसबी
· होडी
– नौका,तर,नाव
· क्षत
– माफी
· क्षय
– ह्रास,झीज
· क्षीण
– अशक्त
· क्षुधा
– भूक
· क्षेम
– हित,कल्याण,कुशल
· क्षोभ
– क्रोध