Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الخميس، 5 أغسطس 2021

राज्य सरकारचा मोठा निर्णय पदवी परीक्षेसाठी CET (सीईटी) नाही पण !

 

 

राज्य सरकारचा मोठा निर्णय पदवी परीक्षेसाठी CET (सीईटी) नाही पण !

सीईटी ऑनलाइन , पण घरातून नाही

सीईटी ऑनलाइन

 




 

v  व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागेलच .

कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी परीक्षा न घेण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील गुणच ग्राह्य धरले जाणार आहेत. उद्यापासून या पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

                  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील वर्षापेक्षा यंदा  बारावीमध्ये 33 हजार जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 13 लाख 962 इतकी आहे. प्रथम वर्षाचे प्रवेश बारावीच्या निकालानुसार करण्याचा निर्णय कुलगुरूसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सामत यांनी यावेळी दिली .

                व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 26 ऑगस्टपासून सीईटी घेण्यात येणार आहे. एमबीए, एमसीए, आर्टिटेक्चर , बचलर  ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बी. एड., एलएलबी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागेल. इंजिनीयरिंगसाठी दोन सत्रात सीईटी होणार असून पहिले सत्र१२ सप्टेंबर तर दुसरे सत्र 19 सप्टेंबरपासून सुरू होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, कोरीना परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणाशी चर्चा करून सीईटीच्या अंतिम तारखा ठरवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सीईटी ऑनलाइन, पण घरातून नाही

सीईटी परीक्षा या ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत, परंतु त्या घरी राहून नाही तर केंद्रावर जाऊन द्याव्या लागतील.

त्यासाठी परीक्षा केंद्रे वाढवण्याचाही विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

 


ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Write a comment.