Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الأحد، 26 سبتمبر 2021

महात्मा गांधी जयंती

 महात्मा गांधी जयंती भाषण

 २ ऑक्टोबर

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे सेनापती व जगातील परतंत्र लोकांना सत्याग्रहाचा नवा मार्ग दाखविणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधल्या पोरबंदर गावी २ ऑक्टोबर, १८६९ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई.

الخميس، 23 سبتمبر 2021

भूगोल GK Quiz

Geography Test

Indian Geography Quiz

Test Exams

Question of

Good Try!
You Got out of answers correct!
That's

الثلاثاء، 21 سبتمبر 2021

वस्तू कविता चाचणी

 वस्तू कविता चाचणी 

प्र ५ नैसर्गिक वनस्पती व प्राणी चाचणी क्र.2

 दहावी भूगोल प्र ५ नैसर्गिक वनस्पती व प्राणी चाचणी क्र.2


सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 




दहावी मराठी व्हिडीओ व स्वाध्याय ssc

 दहावी मराठी विषय पाठास अनुसरून अभ्यास करण्यासाठी

 एकत्ररीत्या व्हिडीओ व स्वाध्याय 




الخميس، 16 سبتمبر 2021

आलंकारिक शब्द

 

आलंकारिक शब्द

 अष्टपैलू - सर्व गुणसंपन्न

अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस

अकलेचा कांदा - मूर्ख

अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस

अरण्यरुदन  - ज्याचा उपयोग नाही असे कृत्य

अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारे

अक्षरशत्रू - निरक्षर, अडाणी

नैसर्गिक वनस्पती व प्राणी सराव चाचणी प्रश्न

 नैसर्गिक वनस्पती व प्राणी सराव चाचणी प्रश्न  

उत्तमलक्षण कविता चाचणी 1

 उत्तमलक्षण कविता चाचणी 1 

الثلاثاء، 14 سبتمبر 2021

लोभी राजा -Greedy King- Marathi Katha

 

 Greedy King- Marathi Story | लोभी राजा | Marathi Katha


फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. इंद्रप्रस्थ एका आटपाट नगराचा राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही छान चालले होते. पण तरीही राजा अस्वस्थ होता. कारण त्याच्याकडे भरपूर धन होते. तरीही त्याला अजून धन मिळावे असे त्याला  वाटत होते .

एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा दोन दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. ते पाहून तो तपस्वी खूश होतो व त्याला म्हणतो, ‍’राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग’. तो लोभी राजा म्हणातो, ‘मला असा वर द्या की मी ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल.तपस्वी म्हणतो, ‘नीट विचार कर. नंतर पश्चाताप करशील.

          राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तू म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खूष होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो, त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्यावेळाने त्याला भूक लागते. म्हणन तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात.

त्याला काहीच खाता, पिता येत नाही. कारण ज्याला तो हात लावी ते सोन्याचे होई. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदातने तिला घेण्यासाठी हात करतो, तर तीही  सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दु:खी होतो.त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चुक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो.

तात्‍पर्य: कोणत्याही गोष्टीचा अति लोभ वाईटच.

الاثنين، 13 سبتمبر 2021

वितरणाचे नकाशे स्वाध्याय चाचणी क्र. 1

 नववी भूगोल प्र.1 वितरणाचे नकाशे स्वाध्याय चाचणी क्र. 1 





दहावी भूगोल प्र.4 हवामान चाचणी

 दहावी भूगोल प्र.4 हवामान चाचणी 


इतर प्रकरणाच्या चाचणी सोडवण्यासाठी -  

आजी : कुटुंबाच आगळ चाचणी

 आजी : कुटुंबाच आगळ दहावी मराठी चाचणी क्र. 1 



السبت، 11 سبتمبر 2021

बोधकथा : मराठी Marathi story ,marathi katha


मराठी बोधकथा marathi katha   



मराठी कथा वाचन करण्यासाठी तुम्हाला आवडलेल्या कथेच्या नावावर टच करा.कथा आपणास वाचनास उपलब्ध होईल.

या ब्लॉगवर जास्तीत जास्त कथा यापुढे टाकण्यात येतील .


  *   भविष्यात शूर Marathi story  

   : सूरक्षा रक्षक आणि राॅॅकी मराठी अपूर्ण कथा पूर्ण करा

मराठी बोधकथा dream -स्वप्न 

अविचारी मित्रांचा बळी 

रात्रीची गस्त दिलेल्या  शब्दावरून कथा पूर्ण करा .

* कष्टाची कमाई  कथा पूर्ण करा .

जीवन जगण्याची कला 

उंटाचा अतिशहाणपणा 

रानटी व गावटी हंस 

दैवान दिले कर्माने नेले 

परोपकार बोधकथा

मनशांती मराठी बोधकथा 

अनुभवाचा फायदा........ 

दुर्दैवी भिकारी 

अति लोभाचे फळ 

समुद्र किनारी पिकनिक 

धूर्त वटवाघूळ 

सोन्याचा मुकुट व चांदीचे पाय 

देव कोणाचा ?

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी 

चोरावर मोर 


कथा आवडल्यास अथवा काही सूचना असलेस जरून कळवा आवश्यक तेवढे 

बदल यथावकाश केले जातील 

الخميس، 9 سبتمبر 2021

कोल्हापूर जिल्हा विशेष माहिती

 

कोल्हापूर  जिल्हा विशेष माहिती 




 जनगणना २०११

एकूण लोकसंख्या                        पुरुष         :     महिला प्रमाण                                                  एकूण साक्षरता

३८,७४,०१५                                       १०००       :         ९५३                                                                                ८२.९०

 

* मुख्यालय : कोल्हापूर

* क्षेत्रफळ : ७,६९२ चौ.कि.मी

* तालुके : कोल्हापूर, आजरा, चंदगड, गगनबावडा, कागल ,पन्हाळा, शाहूवाडी,भुदरगड,गडहिंग्लज,हातकणंगले, राधानगरी, शिरोळ (१२)

الأربعاء، 8 سبتمبر 2021

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर

 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर  


            जागतिक साक्षरता दिन  

              साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

الثلاثاء، 7 سبتمبر 2021

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करणेबाबत.

 अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७. डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११००१

दूरध्वनी क्रमांक : ०२० / २६१२६७२६ / २६१२३५१५ Web Site-www.dmae.maharashtra.gov.in

जा.क्र. आसादिन २०२१-२२ / का-४ / 912

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व.

२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सर्व.

३. शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जि.प. सर्व.

विषय : ०८ सप्टेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करणेबाबत.

राज्यातील प्रत्येक प्रौढ निरक्षरास साक्षर करुन त्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे व सक्षम जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन देणे आवश्यक आहे.

दिनांक ०८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून खालील कार्यक्रमांचे ऑनलाईन पध्दतीने व शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सप्ताहामध्ये आयोजन करावे. तसेच आपले अधीनस्त सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करणेत यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. सदर कार्यक्रमांसाठी सेवाभावी संस्था, युवक मंडळे, क्रीडा मंडळे, महिला बचतगट, महिला जेष्ठ नागरिक संघ इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.

१. कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी.

२. साक्षरता विषयावर ऑनलाईन पध्दतीने रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन करावे.

३. भित्तीपत्रक व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करावे.

(मा. संचालक यांच्या मान्यतेने)

प्रत माहितीस्तव सादर

१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे,

२. विभागिय शिक्षण उपसंचालक, सर्व 

(राजेश क्षीरसागर)

उपसंचालक

अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे ०१.

आठवी भूगोल चाचणी क्र.1

 आठवी भूगोल चाचणी क्र.1   

प्र. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ 

या प्रकरणावर चाचणी सोडवल्यानंतर व आपण पास झाल्यास आपणास आपल्या मेल 

वरती सर्टिफिकेट मिळेल ते डाऊनलोड करून घ्यावे .

السبت، 4 سبتمبر 2021

दहावी भूगोल प्र.३ प्राकृतिक रचना चाचणी








आरोग्यसेवा परीक्षा प्रश्न gk

 

1. 'डायनामाईट'चा शोध कोणी लावला .





ANSWER= (B) नोबेल

 

2. अवकाश यानातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो ..





ANSWER= (A) काळा

 

3. खालील पैकी कोणता रोग 'डी' जीवनसत्वाच्या अभावी होतो .





ANSWER= (C) मुडदूस

 

4 . रसायनाचा राजा कोणाला संबोधतात .





ANSWER= (A) सल्फ्युरीक अॅसिड

 

5 . रक्त गोठण्याच्या क्रियेत फ्रायब्रीनोजेनचे रुपांतर कशामुळे होते ?





ANSWER= (C) फायब्रीन

 

6 .मनुष्याच्या गुणसूत्रांची संख्या किती ?





ANSWER= (D) ४६

 

7 . निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते ?





ANSWER= (D) दृष्टीपटलावर

 

8 . मलेरिया............मुळे होतो ?





ANSWER= (D) प्लाझमोडियम

 

9 . एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात ?





ANSWER= (C) आदिजीव

 

10 . आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच ?





ANSWER= (C) हायड्रोजन

الخميس، 2 سبتمبر 2021

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भाषण

 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  भाषण

 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

                   आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन. या दिनानिमित्त सर्व गुरुजनांना वंदन. आजचा दिवस संपूर्ण भारतात थोर धर्म व तत्त्वज्ञानाचे उपासक एक शिक्षक माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा के जातो. या महान तत्त्ववेत्याचे विचार एक व्यक्ती आणि एक शिक्षक सर्वासी चिंतनीय आहेत. शिक्षकाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, सुसज्ज इमारती आणि साधने आली तरी आदर्श शिक्षकांची जागा ती घेऊ शकणार नाहीत.'

           शिक्षक म्हणजे नेमके काय ? तर शि-शिलवान, क्ष-क्षमाशील, क-कला ज्यांच्याकडे शिल, क्षमा, आणि कला, कर्तृत्व याचा त्रिवेणी संगम आहे? म्हणजे शिक्षक,...........

संपूर्ण  पहाणेसाठी  




 

व्हिडीओ  पहा     - 



الأربعاء، 1 سبتمبر 2021

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह २०२१

 ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविणेबाबत....

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


प्रस्तावना:

प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते. यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात.

संपूर्ण शासन निर्णय व विद्यार्थ्यानसाठी कोणत्या स्पर्धा घ्यावयाच्या जाणून घेणेस  click here येथे क्लिक करा .

वाचा किंवा dowanload करा .