अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७. डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११००१
दूरध्वनी क्रमांक : ०२० / २६१२६७२६ / २६१२३५१५ Web Site-www.dmae.maharashtra.gov.in
जा.क्र. आसादिन २०२१-२२ / का-४ / 912
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व.
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सर्व.
३. शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) जि.प. सर्व.
विषय : ०८ सप्टेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करणेबाबत.
राज्यातील प्रत्येक प्रौढ निरक्षरास साक्षर करुन त्यांना अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे व सक्षम जीवन जगण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्राप्त करुन देणे आवश्यक आहे.
दिनांक ०८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून खालील कार्यक्रमांचे ऑनलाईन पध्दतीने व शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सप्ताहामध्ये आयोजन करावे. तसेच आपले अधीनस्त सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचित करणेत यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. सदर कार्यक्रमांसाठी सेवाभावी संस्था, युवक मंडळे, क्रीडा मंडळे, महिला बचतगट, महिला जेष्ठ नागरिक संघ इ. यांचे सहकार्य घेण्यात यावे.
१. कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी.
२. साक्षरता विषयावर ऑनलाईन पध्दतीने रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन करावे.
३. भित्तीपत्रक व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करावे.
(मा. संचालक यांच्या मान्यतेने)
प्रत माहितीस्तव सादर
१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे,
२. विभागिय शिक्षण उपसंचालक, सर्व
(राजेश क्षीरसागर)
उपसंचालक
अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे ०१.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.