धनाचा विनियोग Marathi Katha
एक शेतकरी अतिशय गरीब होता.पण शेतात काम करताना तो अतिशय प्रामाणिक पणे काम करत होता.गरीब असूनही कधी तो चोरी लांडी लबाडी करत न्हवता.आपल्या जवळ असलेल्या गोष्टीतच तो धन्य मानत होता .एवढेच न्हवे तर त्याच्या जवळ कोणी दान मागितले तरी तो कसे देवू असे न म्हणता आहे त्यातील देवून समोरच्या याचकाची गरज
पूर्ण करत असे . एकदा शेतकरी शेतात काम करीत
असताना , तो जमीन खणू लागला असताना खणत खणत खूपच खोल खणत गेला. कामात तो
एवढा मग्न होता की त्याला किती खणत गेलो हेच कळले नाही .खूप खोल गेल्यावर त्याला
तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता.
प्रथम
नागाला पाहून शेतकरी खूप घाबरला ,मुळात गरीब दानशूर असल्याने त्याला त्या धनाचा
अजिबात मोह न्हवता ,त्यामुळे तो मागे सरू लागला .नागाला वाटले आता आपल्यास हा ठार
मारणार या विचाराने वृद्ध नाग त्या गरीब शेतकऱ्यास म्हणाला, तुम्ही मला मारू नका तुम्हाला
हवे तेवढे धन मी देतो ; यावर शेतकऱ्याने नागाला विचारले,”हे नागदेवता, तुम्ही इथे
काय करता आहात.” नाग म्हणाला,” माझ्या
पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.” मग शेतकऱ्याने
पुन्हा विचारले ,” पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी
त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.
उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत
काय” नाग म्हणाला,” कसं शक्य आहे, हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत:
या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा
दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.”
हे ऐकून शेतकरी नागाला म्हणाला,”
मग नागदेवा, तुमच्या असल्या या
श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून
दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग”
तात्पर्य – ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्यमात्राला
काहीच फायदा नाही.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.