दुट्प्पी वर्तन !
एकदा एका जंगलामध्ये एका कोल्हाच्या मागे एक शिकारी लागला होता. त्याला टाळीत कोल्हा लपत छपत पुढे पुढे पळत होता. परंतु शिकारी त्याचा पाठलाग सोडीत नव्हता. पळता पळता कोल्ह्याने एका लाकूडतोड्याला पाहिले. हा लाकूडतोडया आपल्याला नक्की मदत करील असे वाटून कोल्हा त्याच्याकडे आला आणि आपले पंजे जोडून म्हणाला.
"दादा, माझ्या मागे शिकारी लागलाय. कृपा करूरून मला लपायला कुठे तरी जागा
दे." लाकूडतोड्याने अगदी उदारमनाने त्याला आपल्या झोपडीत लपायला जागा दिली.
कोल्हा त्याच्या झोपडीत जाऊन बसला. काही वेळ जातो ना जातो तोच तो शिकारी धापा
टाकीत त्या लाकूडतोड्याकडे आला. इकडे तिकडे नजर टाकीत त्याने लाकूडतोड्याला
विचारले,
"दादा, या रस्त्याने एक कोल्हा एवढ्यात गेला का?" लाकूडतोड्या
कोल्ह्याला आत आवाज जाईल इतक्या मोठ्यानं म्हणाला,
"नाही बुवा,
मी तरी या रस्त्याने कोल्हा जाताना पाहिला नाही. परंतु बोलता बोलता
त्या शिकाऱ्याला कोल्हा आत झोपडीत असल्याचे खुणेने सुचविले. कोल्हाने आतून
लाकूडतोड्याने केलेली खूण पाहिली. परंतु कोल्हपाच्या सुदैवाने ती खूण त्या मूर्ख
शिकाऱ्याला कळली नाही. तो सरळ पुढे निघून गेला काही वेळाने कोल्हा झोपडीतून बाहेर
आला. लाकूडतोड॒याकडे तुच्छतेने पहात तो जाण्यासाठी वळला तो लाकूडतोड्याने त्याला
हटकले.
"काय
कोल्हेबुवा, सरळ निघून चाललात जीव वाचविणाराचे आभार
मानण्याचे सौजन्यही ना तुमच्याकडे!" त्यावर हसून कोल्हा म्हणाला;
"दादा, आपल्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक आहे बुवा. माझा जीव वाचवण्याचा आव आणून तुम्ही मला आपल्या घरात लपायला जागा दिलीत आणि
खुणेन मी आत असल्याचे सांगून मला माझ्या
शत्रूच्या हवाली करीत होतात. तुम्ही खूण केलेली मी पाहिली. सुदैवाने मी वाचलो.
आपल्या मदतीने नव्हे तेव्हा आता हे दुटप्पी वागणं सोडून द्या. आपले दुटप्पी वागणं
कुणाच्याही लक्षात येत नाही अस समजू नका. कुणाच्या ना कुणाच्या ते लक्षात येतंच,
येतो मी."
आपला कावा उघडपणे सांगणाऱ्या कोल्ह्याकडे लाकूडतोडया पहातच राहिला.आज आपल्या आजूबाजूला असे अनेक लाकूडतोडे आहेत.चतुर कोल्ह्या प्रमाणे आपणही सावध असणे आवश्यक आहे.
Best sir
ردحذف