आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Womens Day)
भारतात मुंबई येथे पहिला
महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी
साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर
स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी
आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय,
सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा
स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही
८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा
करताना दिसून येतो. .
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले.
१९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८
मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा
करवा यासाठी आवाहन केले.
दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन (International
Womens Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो.
महिलादिनामित्त (Womens Day 2022) आपण आपल्या आयुष्यात विशेष स्थान असलेल्या
स्त्रीलाआदर भावाने शुभेच्छा देणे आवश्यक आहे , मग आई असो पत्नी, बहिणी, आजी, मैत्रीण असो किंवा
इतर कोणी महिला त्यांना शुभेच्छा (Womens Day Wishes) देतो आणि या खास दिवशी त्यांना विशेष
वागणूक देतो. या खास दिनी महिलांचा आदर केला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते.
यावर्षी तुम्ही सुद्धा महिला दिनानिमित्त तुम्ही तुमच्या जवळच्या महिलांना,
मैत्रिणींना मराठीमध्ये शुभेच्छा संदेश ( Womens Day Wishes In Marathi) पाठवून आनंदात महिला हा दिवस साजरा करु शकता.
त्यासाठी कमेंट
बॉक्स मध्ये चारोळी स्वरुपात शुभेच्छा संदेश पाठवू शकता .
उदा.
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे
भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे,
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
तुझी माया तुझी ममता तुझे प्रेम जणू
जगात भारी
तूच आदिशक्ती तूच माता तूच महाकाली वरदायिनी
भारी
तुझ्याच कृपेने नटली जणू सृष्टी सारी .....
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…
No comments:
Post a Comment
Write a comment.