Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الأحد، 24 يوليو 2022

सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय मराठी बोधकथा

 

सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय


नवनवीन  बोधकथा वाचनासाठी  येथे क्लिक करा  

एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे खूपच मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती सर्वत्र वाढू लागली, सगळीकडून भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले भगवान विष्णुला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता, त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत..

गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहात होते. भिकुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला.

त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्णुसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्हणाले, मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करु शकत नाहीं कारण मी विष्णुला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे." लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेटने  सर्वाना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा भिकुशेटच्या पेढी वर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.

भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते  कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला. भिकुशेट म्हणाले," भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरु शकतो. त्या विष्णुला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोगी  नव्हता पण या विष्णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत."

            मराठी बोधकथा तात्पर्य - मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा

आपल्या कडे  काही नाविन्य पूर्ण कथा असतील तर जरूर पाठवा  .

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Write a comment.