राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन (Rakhi Purnima Marathi)
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या
दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण
म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा
संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि
पवित्र असते.
राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन (Rakhi
Purnima Marathi) हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण
भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या
भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच
महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या
पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही
परंपरा चालत आली आहे. या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते की, या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली. रक्षाबंधन माहिती नेमकी (Raksha
Bandhan Chi Mahiti) काय आहे? त्याचा इतिहास
काय आहे? याचे नक्की काय महत्त्व आहे जाणून घेऊया. राखी पौर्णिमा मराठी माहिती (Raksha Bandhan Mahiti In Marathi) खास
तुमच्यासाठी.