मोबाईल श्राप की वरदान मराठी निबंध। mobile shap ki vardan nibandh
आज संपूर्ण मानवजातच जगात मोबाईल शिवाय अपूर्ण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . मनुष्याद्वारे केलेल्या शोधामध्ये मोबाईल हे एक महत्त्वाचे साधन आहे. आज एकविसाव्या शतकात मनुष्य मोबाईल शिवाय राहू शकत नाही. एक दिवस अन्ना वाचून राहू शकेल पण मोबाईल नसेल तर त्याचा जीव कासावीस होईल .त्याची चिडचिड वाढलेली पहावयास मिळेल.आज अपवाद वगळता प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात मोबाईलच्या अलार्मने होते. व्यवसाय किंवा नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहणे मोबाईल मुळे सोपे झाले आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईल चे चलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा महत्वाच्या भाग बनला आहे. बाजारात देखील मोबाईलचे वेगवेगळी विशेषता असणारे मॉडेल उपलब्ध आहेत आणि तरुणांमध्ये नवीन नवीन मॉडेल घेण्याचा क्रेझ वाढत आहे.
लहान लहान मुले आपला अभ्यास
पूर्ण झाल्यावर आई-वडिलांकडून गेम्स खेळायला मोबाईल मागतात. मोबाईल मुळे आपण
कोणत्याही स्थानाच्या नकाशा मिळवू शकतो व कोणाचीही मदत न घेता तेथे पोहचू शकतो.
मोबाईल ही विज्ञानाची अमूल्य देण आहे. मोबाईल ने आपले जीवन सोपे बनवले आहे. मोबाईल
मुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या लोकांशी बातचीत करू शकतो. व्हिडीओ
कॉलिंगच्या माध्यमाने दूर असलेल्या नातेवाईकांना आपण पाहू शकतो.
मोबाईल मध्ये रेडिओ आणि mp3 प्लेयर सारखे फंक्शन्स असतात यांच्या मदतीने आपण गाणे व बातम्या ऐकू
शकतो. मोबाईल मध्ये कॅल्क्युलेटर चे देखील फंक्शन असते म्हणून आता हिशोब
करण्यासाठी सोबत मोठे कॅल्क्युलेटर सांभाळण्याची गरज नाही, मोबाईलच्या
मदतीने आपण केव्हाही कॅल्क्युलेटर वापरू शकतो. जास्त करून लोक मोबाईल मध्ये
व्हिडिओ आणि मूव्हीज पाहतात. यासाठी ते यूट्यूब अॅपचा वापर करतात. एका पद्धतीने
मोबाईल ने संपूर्ण जगाला त्यात सामावून घेतले आहे. मोबाईलला असलेल्या
कॅमेऱ्याद्वारे आपण सुंदर फोटो काढू शकतात म्हणून बाहेर कुठे फिरायला जाताना सोबत
कॅमेरा नेण्याची आवश्यकता नाही. कारण मोबाईल द्वारे अतिशय चांगले फोटो काढणे सरल
झाले आहे. मोबाइलच्या पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्याला सेल्फी कॅमेरा म्हटले
जाते. या कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे फोटो काढू शकतात.
मोबाईल मध्ये असलेल्या अॅप्स
च्या मदतीने आपण ऑनलाइन खरीदारी करू शकतात. पूर्वीसारखे बाजारात जाऊन तासनतास
वस्तू शोधण्याची आता गरज नाही. घरबसल्या मोबाईलवर आपण योग्य वस्तू शोधू शकतात व
तिला ऑनलाईन ऑर्डर करू शकता. पैसे पाठवण्यासाठी देखील आता बँकेत जाण्याची आवश्यकता
नाही. मोबाईल मध्ये असलेल्या ऑनलाईन पेमेंट अँपच्या मदतीने घर बसल्या पैसे पाठवता
येतात.
मोबाईल
चे खूप सारे फायदे आहेत. जर कोणाला तात्काळ मदत हवी असेल तर इमर्जन्सी नंबर जसे
पोलीस,
अॅम्बुलन्स यांना फोन करून बोलवता येते. सध्याचे युग हे सोशल
मीडियाचे युग आहे. दररोज लोक सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतात. कमेंट्स च्या
माध्यमाने एक दुसऱ्याच्या फोटो बद्दल कमेंट पण करतात.
मोबाईलचे
अनेक फायदे आहेत. पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. मोबाइल द्वारे ब्लॅकमेलिंग
चे प्रकार खूप वाढले आहेत. आई वडील हे कामावरून आलेत की मोबाइल मध्ये व्यस्त होऊन
जातात. ज्यामुळे मुलानं सोबत त्यांना वेळ मिळत नाही. सर्व शुभेच्छा संदेश ऑनलाईन
पाठवले जातात म्हणून आधी सारखा एक दुसऱ्याला भेटण्याचा आनंद येत नाही.
आज
मोबाईलच्या अतिवापराने लोकांना त्याचे व्यसन जडत आहे. युवकांमध्ये हे प्रमाण वाढत आहे.
दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळणे, इंटरनेट वापरने यामुळे
डोळ्यांना त्रास होतो. डोकेदुखी, डोळे चुरचुरणे यासारख्या
समस्या वाढीस लागतात. खूप साऱ्या लोकांना रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ
ठेवण्याची सवय असते, पण असे केलयाने कॅन्सर चा धोका वाढतो.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो व झोप कमी होते.
मोबाईलचा जास्त वापराने एकाग्रता कमी होते. म्हणून लहान मुलांच्या हातात मोबाईल
देणे जास्तीत जास्त टाळावे.मोबाईलच्या अति वापरणे मायग्रेन सारखे आजार डोके वर
काढतात .यात शंका नाही की मोबाईलचे खूप सारे फायदे आहेत व मोबाईल एक महत्त्वाचे
साधन आहे. पण कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. मोबाईलच्या बाबतीत देखील तसेच
आहे. एकीकडे याचे सकारात्मक परिणाम आहेत तर दुसरीकडे नकारात्मक प्रभाव देखील आहेत.
म्हणून मोबाईल वापरणाऱ्या नवीन तरुणांना त्याचे योग्य उपयोग समजावून दिले पाहिजे.
मोबाईलचा वापर संतुलनात करायला हवा.नाहीतर
एक दिवस सगळच गमावून बसावे लागेल .कुटुंबातील व समाजातील सवांद रुपी नौका कधी
बुडाली हे कळणारही नाही . महाराष्ट्र ही संताची भूमी आहे .
No comments:
Post a Comment
Write a comment.