Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Wednesday, 21 September 2022

आजचे शिक्षण आणि बेकारी मराठी भाषण

 

आजचे शिक्षण आणि बेकारी /मराठी भाषण 

marathi  bhashan aajche shixan aani bekari 

Education give a perfect face to life

Education gives holy power to fight

Education destroies darkness with the help of light

Education gives a man broad sight.

असं शिक्षणाचं वर्णन केलं जातं. माणसाला जीवनाचं अधिष्ठान देणारं, एक मंगल असं सामर्थ्य देणारं, जीवनातील अंध:कार दूर करणारं, मानवाला विशाल दृष्टिकोन देणारं अ शिक्षण शिक्षणाचं हे वर्णन मानवी मनाला दिलासा देणारं आहे. आजच्या विज्ञान युगात जगायचं असेल, नुसत जगायच जरी असेल तरी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सूर्यप्रकाशाइतक सत्य आहे. म्हणूनच साक्षरता अभियान हा भव्य संकल्प आम्ही केला आहे.

शिक्षणानं आज अनेक क्षेत्रांत आपली गौरव परंपरा अबाधित राखली आहे. मानवी कर्तृत्वाला अनेक नवनवीन क्षितीजे शिक्षणाने दाखवली आहेत, कर्तृत्वाची अनेक नवी दालने आज युवकांना खुणावत आहेत. त्यांचा मार्ग शिक्षणाच्या द्वारातून जातो. अर्थातच शिक्षण हे जीवनाच्या सुखाचे साधन झाले आहे. शिक्षणाचा मूळ दृष्टिकोन हा "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास" असा आहे. तो साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न १९७६ पासून सुरू झालेल्या व्यावसायिक शिक्षण पद्धतीतून केला जात आहे. पूर्वीचे जीवनापासून दूर असलेले शिक्षण या पद्धतीमुळे जीवनाभिमुख झाले. नुसत्या [डियांची भेंडोळी येऊन फिरण्यापेक्षा विद्यार्थी एखाद्या कलेत कुशल होऊ लागला. त्याला मिळालेली ही कुशलता त्याला रोजी-रोटी मिळवून देण्यास साहाय्य करते. आज शिक्षणात व्हिल इलेक्ट्रिकल मेकनिकल, हॉर्टिकल्चर ऑटोमोबाईल अध्यापन, संगणक अशा विविध शाखा निर्माण झाल्या असून त्या-त्या शाखांची पदविका घेणारे तरुण आज जीवनसंघर्षात यशस्वी होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक कॉलेजांमधून या शाखांच्या शिक्षणाचा लाभ हजारो विद्यार्थी घेताना दिसताहेत. भविष्याच्या दिशेने पाऊले टाकण्याचा प्रयत्न करणारे हे युवक अंतिम ध्येयापर्यंत पोहचतील का? पोहचू शकतील का? हा प्रश्न उदभवतो आणि हा प्रश्न आपल्याबरोबर अनेक शंका-भयशंका घेऊन येतो. कारण भारताची सद्य:स्थिती पाहिली. 'सर नाइलाजाने या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असे द्यावे लागते आणि भारताच्या भविष्यकाळाची भीती वाटू लागते.

भारतीय संविधानातील घटनेनुसार भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे असे कलम आहे; परंतु येथील किती नागरिकांना अन्न मिळते. कितींना वस्त्र आणि किती जणांना निवारा मिळतो. हा प्रश्नच आहे. अर्थात लोकसंख्येची अमर्याद वाढ हे अत्यंत विचार करायला लावणारे कारण यामागे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या तीन जीवनावश्यक बाबींमध्ये शिक्षण याही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे शिक्षण मिळणे हा जन्मसिद्ध अधिकार झाला आहे. शासन यंत्रणा, शिक्षण मंडळ, शिक्षणसंस्था यांनी शिक्षणाचा प्रसार बहुसंख्य प्रदेशात केला असला तरी आजमितीला आपल्या देशात ४८% लोक निरक्षर आहेत आणि जे साक्षर आहेत. त्यातील किर्ती जण नोकरी-धंद्यात आहेत, हाही प्रश्नच आहे. भारतातील बेकारीचे प्रमाण ५७% आहे. लोकसंख्या शिक्षण प्रसार आणि बेकारीचे प्रमाण पाहिले की, देशाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागते. पदव्यांची भेंडोळी घेऊन निराश अवस्थेत फिरणारे तरुण पाहिले की शिक्षणातील फोलपणा लक्षात येतो. त्यातच श्रमप्रतिष्ठा कमी झाली आहे. चार इयत्ता शिकलेला तरुण हलक्या प्रतीचे काम किंवा व्यावसाय करण्यात लाज मानतो. लोकसंख्येतील भयंकर वाढ, शिक्षणातील फोलपणा बेकारी अशा दुष्टचक्रात सापडलेली ही पिढी नैराश्यवादाकडे झुकते आहे. त्यातच नोकरी, धंदा या क्षेत्रांना वशिलेबाजी, शिफारस, पैशाची लाच, राखीव जागा या दृष्ट ग्रहांणी ग्रासले आहे. भ्रष्टाचार हा तर या क्षेत्रातील शिष्टाचार बनला आहे. बेकारीने त्रस्त झालेला युवक हा भ्रष्टाचार करून नोकरी मिळाल्यास भ्रष्टाचारालाही तयार होतो आहे. नैराश्यवादाकडे झुकलेली ही पिढी व्यसनाधिनता, गुन्हेगारी या जगाकडे वळते आहे. कारण प्रश्न पोटाचा आहे. कोणालाही जन्मतः गुन्हेगार बनायचे नसते. पण नियती आणि परिस्थिती यांच्या विळख्यात सापडलेला तरुण पोटात भुकेची आग भडकली की नीतिमता विसरतो आणि गुन्हेगारीकडे वळतो. कारण धर्म आणि नीतीच्या गप्पा फक्त भरल्यापोटीच मारता येतात. हे कटू असले तरी सत्य आहे. भूकेची आग विवेकाला आणि विचाराला जाळून टाकते आणि गुन्हेगारांची एक नवीन पिढी बेकारीच्या खत बीजातून निर्माण होते आहे. आमचे सरकार या बाबतीत उदासीन नसल तरी कार्यशीलही नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचाच आपापल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा लागतो आणि लागणार आहे. त्यासाठी लोकसंख्यावाढीवर मर्यादा, श्रमप्रतिष्ठा आणि व्यवसाय शिक्षण या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. तरच या बेकारीच्या राक्षसाला आपण नेस्तनाबूत करू शकलो नाही तर देशाची भावी पिढीच नव्हे तर देशही धोक्यात आहे. कारण सैन्य पोटावर चालत आणि पोट भरलेली असली तरच ते लढू शकते. तेव्हा भारताचा भविष्यकाळ उज्वल करायचा असेल तर बेकारीचा हा अंधःकार आधी दूर करायला हवा. शेतीप्रधान असलेला भारत हळूहळू, औद्योगिकीकरणाकडे वळतोय, लंझरी मान्सूनवर अवलंबून असलेली आमची शेती सुजलाम, सुफलाम या ब्रीदापासून दूरदूर चालली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. तुम्हाला, मला, आपणा सर्वांना आणि या विचार मंथनातून निर्माण होणारं अमृत बेकारी ही विषववल्ली समूळ नष्ट करील, याचा विश्वास वाटतोय आम्हा भारत पुत्रांना, खरं ना?

मोबाईल शाप की वरदान  मराठी भाषण 

click here 

No comments:

Post a Comment

Write a comment.