अति लोभाचे फळ
एका खेडे गावात 'दामू' नावाचा एक माणूस राहात होता. तो देवाचा भक्त होता. त्याच्या
भक्तीवर खूष होऊन एक दिवस देवाने त्याला एक कोंबडी बक्षीस दिली. ही कोंबडी दररोज
एक सोन्याचे अंडे द्यायची. दामू ते अंडे सोनाराला विकून भरपूर पैसे मिळवायचा. असे
बरेच दिवस चालले होते. एक दिवस दामूच्या मनात विचार आला. रोज अंडे
मिळणार. ते
विकून पैसे मिळणार असे हळूहळू पैसे मिळण्यापेक्षा एकदम पैसे मिळाले तर लगेच एखादा
बंगला खरेदी करता येईल. शेतीवाडी घेता येईल. घरात नोकरचाकर ठेवता येतील आणि एक
श्रीमंत गृहस्थ म्हणून गावांतून
, शहरांतून
फिरता येईल.
घरात
पत्नीला,
मुलांना हिऱ्या मोत्याचे
अलंकार आणि उंची वस्त्रे देता येतील. घरात
बाहेर सर्व ठिकाणी आपला सन्मान होईल. ही कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देते. म्हणजे
हिच्या पोटात असंख्य . सोन्याची अंडी असतील. हिला कापून ती सर्व 'अंडी एकाच वेळी मिळवता येतील.
एक
दिवस त्याने तिला सकाळी न सोडताच ठेवले.सायंकाळी
त्या कोंबडीचे पोट चिरले. क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात
कोबडी मरून पडली. तिच्या पोटात दामूला एकही अंडे सापडले नाही. अति लोभाने दररोज मिळणारे सोन्याचे
अंडे त्याने गमावले आणि कोंबडीही गमावली. बिचारा आपल्या नशिबाला बोल लावीत रडत बसला .
तात्पर्य: अति लोभाचे फळनेहमी वाईटच असते.
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.