Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday, 1 November 2022

इच्छा असेल तर मार्ग दिसेल !

 इच्छा असेल, तर मार्ग दिसेल !



        कोणतेही काम करत असताना प्रथम माणसाला त्या कामात आवड व काम करण्याची इच्छा असणे आवश्यक आहे .म्हणजेच इच्छा असेल तरच मार्ग दिसतो.


        एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. हे जरी सत्य असले तरी त्यासाठी त्याला किती प्रयत्न करावे लागले याचा विचार करणे आवश्यक आहे. यश संपादन करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करण्याची तयारी असावी लागते. अपयशा नंतर यश निश्चित मिळू शकते यावर आपलाच विश्वास हवा .

        एडिसनने आपल्या शोधासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले.या प्रयत्नानंतर ही त्यास ९९९ वेळा अपयश आले.पण तो थकला नाही. थांबला नाही त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती,चिकाटी,आवड यामुळे प्रत्येक अपयशा नंतरही तो नव्या  जोमाने प्रयोग करीत असे.अखेरीस १००० प्रयोगानंतर त्याला यश आले.

        एडिसनच्या शोधामुळे माणसाच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला.एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती,प्रचंड चिकाटी होती .म्हणून तो यशस्वी झाला.इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते,आपण हे लक्षात घेतले पाहिजे.

'जो चालतो त्याचे भाग्यही चालते.जो थांबतो तो संपतो'.'धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे !'या उक्तीप्रमाणे माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे.

online test 

No comments:

Post a Comment

Write a comment.