Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Sunday, 5 February 2023

चोरावर मोर marathi bodhktha

 चोरावर मोर


श्रीरामपूर नावाचं एक गाव होतं. गावातील एक गरी शेतकऱ्याचा मुलगा बारा तेरा वर्षाचा असेल तो रानात गेला अस त्याला खूप तहान लागली. पाणी शोधत शोधत खूप दूर गे असता त्याला एक विहीर दिसली. पण विहीर खूप निर्जन स्थ होती. त्यामुळे तो मनातल्या मनात खूप घाबरला होता. तेवढ्या समोरुन एक आडदांड, खूनशी वृत्तीचा माणूस त्या दिशेने येता त्याने पाहिला. तो चोर दरोडेखोर असावा. त्याचे पाठीवर एक भ मोठे गाठोडे होते.

 चोर एकतर आपल्याला मारील किंवा पळवून नेऊन चोय करायला लावील. असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरीत पाह मुद्दाम हमसाहमशी रडू लागला. त्याचे रडण्याने चोर त्या मुलापाशी येऊन त्याला काय झाले? म्हणून विचारपूस करु लागला.

तो मुलगा रडण्यात खंड न पडता त्याला खोटंच म्हणाला, "मी विहिरीत पाणी किती आहे हे वाकून पाहू लागलो असता माझ्या गळ्यातील सोन्याची चेन विहिरीत पडली आहे. चेनशिवाय मी घरी कसा जाऊ जरी मी घरी गेलो तर आईबाबा मला बेदम मार देतील.

तुझी चेन तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटंच सांगून, चोरीचे पैसे व दागिने त्यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला सांभाळायला लावायचे आणि विहिरीत उडी मारुन चेन हातात लागताच. चेन आणि बोचकं घेवून पसार व्हायचं असा बेत चोराने केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, “बाबा ! हे माझं बोचकं सांभाळ. मी तुला तुझी चेन काढून देतो. "

मुलगा हुशार होता. त्याला चोराच्या मनातील कळले. तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला मानेने होकार दिला. त्याबरोबर चोराने विहिरीत उडी मारुन चेनचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्याचे बोचके घेऊन पसार झाला. गावात जाताच पोलिस ठाण्यावर बोचके नेऊन दिले व चोराचा ठिकाणा सांगितला. पोलिसांनी ताबडतोब चोराचा पाठलाग करुन त्यास पकडले. त्यांनी मुलाला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल, चातुर्याबद्दल बक्षीस दिले.

 इतर मराठी बोधकथा  येथे वाचू शकता  click here 

(तात्पर्य - अतिलोभाचे फळ वाईटच असते.)

No comments:

Post a Comment

Write a comment.