Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Friday, 27 December 2024

फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय

 

 फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय, फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी बाबत स्पष्टीकरण - 27 डिसेंबर 2024..

आजच्या शासन निर्णयातील ठळक मुद्दे:-


1) NPS/DCPS खाते नसणाऱ्या मयत कर्मचाऱ्यांनाही फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी लागू.

याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने द्वारे सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा करण्यात आलेला होता, त्याला यश प्राप्त झाले आहे.. त्यामुळे खाते नसलेल्या मयत कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी चा मार्ग मोकळा झाला आहे..


2) 31 मार्च 2024 शासन निर्णयानुसार ज्यांनी विकल्प दिले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला अश्या कर्मचाऱ्यांना BY DEFAULT जुनी पेन्शन योजने अंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार.. 


3) ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फॅमिली पेन्शन साठी पात्र व्यक्ती नसतील ( पत्नी, लहान मुले) कुटुंब नसलेले कर्मचारी अश्या कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशन केलेल्या अन्य फॅमिली मेम्बर/व्यक्तीस उपदान (ग्रॅच्युटी) मिळेल..


4) राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार नाही.. 

खरं तर जुन्या पेन्शन धारकांना ही राजीनामा दिल्यावर ग्रॅच्युटी मिळत नाही, त्यासाठी 20 वर्ष सेवेनंतर VRS घेणे / सक्तीची सेवानिवृत्ती होणे आवश्यक आहे, 


NPS मध्ये स्वेच्छा निवृत्ती हा विषय सध्या तरी नाही, त्यामुळे त्यांना (राजीनामा दिलेल्या NPS धारकांना) ग्रॅच्युटी मिळू शकत नाही.. भविष्यात GPS/UPS अंतर्गत स्वेच्छा निवृत्ती लागू असल्यास अश्या प्रसंगी कदाचित ग्रॅच्युटि मिळू शकते, पण त्याबाबत GPS/UPS चे डिटेल शासन निर्णय आल्यावरच भाष्य करता येईल.. 


5) मयत कर्मचाऱ्यांचे फॅमिली पेन्शन प्रस्ताव सादर करतांना 31 मार्च 2023 GR मधील नमुना 2 व 3 प्रमाणित करून सादर करावा..


6) ज्यांचे मृत्यू 31 मार्च 2023 पूर्वी झाले आहेत, त्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन प्रस्तावासोबत सानुग्रह अनुदान लाभ घेतला असल्या / नसल्या बाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, तर ज्यांचे मृत्यु 31 मार्च 2023 नंतर झाले आहेत, त्यांच्या बाबत सदर प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही, कारण 31 मार्च 2023 नंतर सदर 10 लाख सानुग्रह अनुदान योजना/ gr बंद / रद्द करण्यात आलेली आहे.. 


7) वरिष्ठ कार्यालयाने महालेखागार कार्यालयाकडे संबंधित मयत कर्मचाऱ्याचा फॅमिली पेन्शन ग्रॅच्युटी प्रस्ताव पाठवतांना त्यापूर्वी कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्याची कर्मचारी हिस्सा रक्कम व त्यावरील व्याज कुटुंबास अदा करणे व शासन हिस्सा व त्यावरील व्याज शासन खात्यात वर्ग करणे आवश्यक आहे, व त्या रक्कमा अदा केल्याचे प्रमाणपत्र (लेखा शीर्ष सह सविस्तर ) पेन्शन प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे.


Sunday, 13 October 2024

साहित्यप्रकार, टोपणनावे व सामान्यज्ञान

 साहित्यप्रकार, टोपणनाव  व सामान्यज्ञान


*#1. काही साहित्यिक , साहित्यिकांची टोपणनाव#*


(1) कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

(2) राम गणेश गडकरी  - गोविंदाग्रज, बाळकराम

(3) वि. वा. शिरवाडकर - कुसुमायज

(4) त्र्यंबक  बापूजी ठोमरे - बालकवी

15) शंकर केशव कानेरकर - गिरीश

(6) प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

(7) आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

(3) दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी

(9) काशिनाथ हरी मोडक - माधवानुज

[10] विनायक जनार्दन करंदीकर - विनायक

(13) मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत 

(14) दत्तात्रय कोंडी घाटे - दत्त 

(18) नारायण मुरलीधर गुप्ते - बी 

(10) चिंतामण अंत्रक खानोलकर - आरती प्रभू 

(17) शंकर काशिनाथ गर्गे ,- (नाट्यछटाकार ) दिवाकर

(18) गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी 

(19) माधव शेवक पटवर्धन - माधव जुलियन 

(20) ना. धो. महानोर - रानकवी,

(21) माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस 

(22) दगडू मारोती पवार -  दया पवार

(12) यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत

(23) धोंडो वासुदेव गद्रे  - काव्यविहारी

(12) नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास

(24) जयवंत दळवी  - ठणठणपाळ 


#2. काही काव्यग्रंथ व त्यांचे कवी #


(1) भावार्थदीपिका  (ज्ञानेश्वरी) - संत ज्ञानेश्वर

(2) अभंगगाथा-संत तुकाराम

(3) नलदमयंती स्वयंवराख्यान - रघुनाथपंडित

(4 ) भावार्थ रामायण- संत एकनाथ

(5) दासबोध व मनाचे श्लोक -  समर्थ रामदास

(5) केकावली-मोरोपंत

(7) गीत रामायण- ग. दि. माडगूळकर

(8) यथार्थदिपिका-वामनपंडित

(9) बिजली - वसंत बापट

(10) शीळ-ना. घ. देशपांडे

(11) ज्वाला आणि फुले -- बाबा आमटे 

(12) स्वेदगंगा-विंदा करंदीकर,


3. काही नाटके व त्यांचे नाटककार


1) शारदा - गोविंद बल्लाळ देवल

(5) साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी  - प्र. के. अत्रे

(2) सौपद्र-बळवंत पांडुरंग किर्लोस्कर

3) कीचकवध, भाऊबंदकी, मानापमान, विदधाहरण - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

(6)  टिळक आणि  आगरकर-विश्राम बेडेकर

(7) नट सम्राट - वि. वा. शिरवाडकर

14) प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन-

राम गणेश गडकरी



Tuesday, 1 October 2024

रक्तदान दिन 1 ऑक्टोबर

  रक्तदान दिन 1 ऑक्टोबर 




विज्ञानाचे आकाशाला गवसणी घालण्याएवढी प्रगती केली आहे. तरीसुद्धा आजपर्यंत मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. अपघात घडल्यानंतर शरीरातले बरेचसे रक्त वाहून जाते. गंभीर शस्त्रक्रियांवेळीही रक्तस्त्रावाने रुग्ण मृत्युमुखी पडतो, गरोदर स्त्रियांना प्रसूतीवेळीही रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया  तर रक्ताची निर्मितीच थांबते  अशा वेळी चार आठवड्यापर्यंत रक्त मिळाले नाही तर रोगी दगावतो. शिवाय अॅनिमिया (पंडुरोग), कावीळ इ. गंभीर प्रकारच्या आजारांसाठीही बाह्य रक्त देण्याची गरज पडते. म्हणूनच रक्त म्हणजे संजीवनी आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान  आहे.

सर्वसाधारणपणे मानवाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते, रक्तदानावेळी ३५० मि.ली. एवढे एकावेळी घेतले जाते. छत्तीस तासात नैसर्गिकरित्या पुन्हा शरीर रक्त भरून काढते. रक्तदानानंतर मनुष्य कामावर जाऊ शकतो.

पुन्हा दर तीन महिन्यांनी तो रक्तदान करू शकतो. सामान्यपणे ज्याला गंभीर आजार नाही किंवा काही विशिष्ट आजाराचा

इतिहास नाही अशी कुणीही प्रौढ व्यक्ती रक्त देऊ शकते. १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व किमान ४५ किलो वजनाची व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र ठरते. त्यापूर्वी त्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास जाणून शारीरिक तपासणी केली जाते. रक्ताच्या  या पराधन (ब्लड डोनेशन) क्रियेत निकोप व्यक्तींचे रक्त गरजू व्यक्तीच्या रक्तप्रवाहात सोडले जाते. तरीही कोणाचेही रक्त कोणाला चालते असे नाही त्यासाठी रक्तगट जुळावे लागतात.

 'कार्ल लैंडस्टायनर' या जीवरसायन शास्त्रज्ञाने अनेक व्यक्तींच्या रक्ताचा अभ्यास करून असे दाखवून दिले की विविध व्यक्तींचे रक्त, जीवनद्रव्यात आणि लोहित कणांवर असणाऱ्या काही पदार्थामुळे वेगळे असते. पुढे झालेल्या अभ्यासाने चार प्रमुख रक्तगट मान्य झाले ते म्हणजे ए, बी, एबी आणि ओ. म्हणून रक्तदानाच्या क्रियेवेळी दाता आणि ग्राहक यांच्या रक्तगटाची तपासणी अत्यंत गरजेची ठरली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजात आपल्याला व्यावसायिक रहदाते पुष्कळ आढळतात, त्यांचे रक्त स्वीकारताना ते एच. आय. व्ही. विरहित असल्याची खात्री करून घ्यावी नाही तर तसे रक्त स्वीकारणाऱ्याला एड्सची लागण होऊ शकते.

रक्ताला पर्याय नाही. ते निर्माण करता येत नाही. पैसा त्याची जागा घेऊ शकत नाही. रक्ताचा स्रोत केवळ बारवच आहे, रक्तदान निरुपद्रवी आहे. रक्त हे नाशवंत आहे. दानातून प्राप्त झालेल्या साठ्याची रक्तपेढ्यांमध्ये काळजी घ्यावी लागते. आपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळते ही कल्पनाच आनंददायी आहे. रक्तदान हे सामाजिक काण आहे म्हणूनच असंख्य रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदानास तयार व्हावे व पुण्यकर्म साधावे. जनतेस रक्तदानाची महाली पटाची म्हणून रक्तदान दिन साजरा केला जातो. युवक, कामगार, वसाहती, शासकीय कार्यालये, महिलामंडळे, सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या सहकार्याने स्वैच्छिक रक्तदान मोहीम यशस्वी करून राज्यास रक्तसंकलनाबाबत स्वयपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आपणही आपल्या वाढदिवशी किंवा राष्ट्रीय सणादिवशी वर्षातून एकदा श्री रक्तदान करूया व म्हणूया

करूनी दान रक्ताचे 

जोडुया  नाते बंधुत्वाचे !

Thursday, 12 September 2024

महाराष्ट्राचा भूगोल स्पर्धा परीक्षा प्रश्नमंजुषा

 महाराष्ट्राचा भूगोल स्पर्धा परीक्षा प्रश्नमंजुषा 




Monday, 24 June 2024

The Path to Personal Development

  

The Path to Personal Development: Strategies for Continuous Growth

Personal development is an ongoing journey of self-improvement, aimed at enhancing your skills, mindset, and overall quality of life. Whether you're looking to boost your career, strengthen relationships, or achieve inner peace, cultivating personal development habits can pave the way to a fulfilling and meaningful life. Here, we explore key strategies and insights to help you embark on and sustain your personal development journey. Every point is made and written in short and simple to understand in short and easy way.

Embrace Self-Awareness

Self-awareness forms the cornerstone of personal development. It involves understanding your strengths, weaknesses, values, and motivations. Start by reflecting on your thoughts, emotions, and behaviors. Journaling can be a powerful tool to track your progress and identify areas for growth. Self-awareness allows you to make informed decisions aligned with your authentic self, fostering personal and professional growth.

Set Clear Goals

Goal-setting provides direction and purpose in personal development. Define both short-term and long-term goals that are specific, measurable, achievable, relevant, and time-bound (SMART). Break down larger goals into smaller, actionable steps to maintain momentum and celebrate milestones along the way. Regularly revisit and adjust your goals to ensure they remain relevant to your evolving aspirations.

Cultivate a Growth Mindset

Adopting a growth mindset is crucial for personal development. Embrace challenges as opportunities for learning and view setbacks as temporary setbacks. Develop resilience by reframing failures as valuable lessons that contribute to your growth. Seek feedback from others and actively seek new experiences to expand your knowledge and skills. A growth mindset fosters adaptability and continuous improvement in various areas of your life.

Prioritize Self-Care

Self-care is essential for maintaining balance and well-being on your personal development journey. Nurture your physical, emotional, and mental health through regular exercise, adequate sleep, and healthy eating habits. Practice mindfulness and relaxation techniques to manage stress and enhance emotional resilience. Allocate time for hobbies, interests, and activities that recharge your energy and bring you joy.

Invest in Learning and Development

Commit to lifelong learning to broaden your knowledge and skills. Take courses, attend workshops, or pursue certifications relevant to your interests and career goals. Stay updated with industry trends and seek mentorship from experienced individuals who can provide guidance and support. Actively seek feedback and be open to constructive criticism to refine your abilities and achieve personal excellence.

Foster Positive Relationships

Build and nurture meaningful relationships with supportive individuals who encourage your growth and well-being. Surround yourself with people who inspire and challenge you to become the best version of yourself. Practice empathy, active listening, and effective communication skills to strengthen connections and resolve conflicts constructively. Cultivating positive relationships enhances your emotional intelligence and enriches your personal development journey.

Reflect and Adapt

Regularly review your progress and reflect on your experiences. Celebrate achievements and identify areas for further improvement. Stay adaptable and embrace change as opportunities for personal growth and innovation. Remain committed to your personal development goals while remaining flexible in your approach. Adjust strategies as needed to overcome challenges and seize new opportunities on your path to continuous improvement.

Conclusion

Personal development is a transformative journey that empowers you to achieve your fullest potential and lead a fulfilling life. By embracing self-awareness, setting clear goals, cultivating a growth mindset, prioritizing self-care, investing in learning, fostering positive relationships, and maintaining adaptability, you can cultivate a meaningful and rewarding personal development journey. Start today with small, actionable steps and commit to ongoing growth to create lasting positive change in your life and those around you.

Wednesday, 5 June 2024

जागतिक पर्यावरण दिन

 

जागतिक पर्यावरण दिन



जागतिक पर्यावरण दिन (WED) दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. १९७३ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले, ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. दरवर्षी, कार्यक्रमाने व्यवसाय, गैर-सरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.

प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो, ज्यात प्रमुख कार्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. आजच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी जगभर पर्यावरण दिवस अगदी थाटा माटाने साजरा केला जातो. त्यादिवशी पुढील जीवनातील परिस्तिथी किती बिकट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते. यासर्वांतूनच या दिवसाची जागरूकता निर्माण होते.

लक्ष्यात ठेवा: आपल्या मातेसमान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी तुम्ही घ्यावी.

 

Sunday, 26 May 2024

10th Result 2023-24 १०वी निकाल २०२३-२४

                                    

                                            


10th Result 2023-24

आपला निकाल पहाण्यासाठी खालील कोणत्याही 

लिंकला टच करा 👇👇👇👇👇👇👇👇

10th Result Links:

1. https://mahresult.nic.in/

2. https://sscresult.mkcl.org/

3. https://sscresult.mahahsscboard.in/

4. https://results.digilocker.gov.in/

5. https://results.targetpublications.org/




Monday, 20 May 2024

12th RESULT 2023-24,१२ वी निकाल



12th Result 2023-24

आपला निकाल पहाण्यासाठी खालील कोणत्याही 
लिंकला टच करा 👇👇👇👇👇👇👇👇PDF च्या खाली जावा 



Links for 12th results 2024 Are :




Friday, 3 May 2024

/Scholarship Exam Result

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२४
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2024


विद्यार्थ्याचा वैयक्तिक निकाल पहाण्यासाठी click here या बटनावर
 क्लिक करा व आपला सिटनंबर टाका 


आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पहाण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
click here

गुणपडताळणी करणेकरीता संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये दि. १०/०५/२०२४ रोजीपर्यंत 
ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Thursday, 11 January 2024

राष्ट्रीय युवक दिन

 राष्ट्रीय युवक दिन


१२ जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस अधिकृतरित्या 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. तारुण्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ! स्वप्ने रंगविण्याचा, उंच भरारी मारण्याचा, ध्येयनिश्चितीचा, वीरता प्रकट करण्याचा सुवर्णकाळ म्हणजे युवावस्था! उपनिषदांच्या काळात सत्यकाम जाबाल, श्वेतकेतु, आरुणि, युवराज सिद्धार्थ यांच्यासारखे तरुण जीवनाचे रहस्य शोधून काढण्यासाठी ऐन तारुण्यात बाहेर पडले.


भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी, समाजसेवकांनी आपली उमलती जीवने व प्राण ध्येयपूर्तीसाठी अर्पण केले. आज देशाच्या स्वातंत्र्याची सुवर्ण जयंती साजरी झाली तरी देशातील अनेक समस्या सोडविण्याचे आव्हान युवापिढीसमोर उभे आहे. लोकसंख्यावाढ, निरक्षरता, अंधश्रद्धा, गरिबी, भ्रष्टाचार, स्वार्थांधता, जातिभेद, अन्याय, बेरोजगारी, हिंसाचार इत्यादी संकटांवर मात करून देशासाठी व समाजासाठी निरपेक्षतेने झटून कार्य करणाऱ्या युवा नेत्यांची आज देशाला अत्यंत गरज आहे.

अण्णाभाऊ साठे भाषण 

"जोपर्यंत लाखो लोक अज्ञानात आणि दारिद्र्यात खितपत पडले आहेत तोपर्यंत त्यांच्या जिवावर शिक्षण घेऊन मग त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करणारा युवक कृतघ्न आणि देशद्रोही होय, गरिबांच्या दुःखाने ज्याला वेदना होतात खरा महात्मा अन्यथा तो दुरात्माच!" असे विवेकानंदांनी म्हटले आहे. आपण सच्चे देशभक्त व्हायचे की देशद्रोही, महात्मा व्हायचे की दुरात्मा याचा निर्णय तरुणांनीच घ्यायचा आहे.


उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघे टाकावे; वन्ही तो चेतवावा । चेतवीताचि चेततो ।। आलस्य अवघाचि दवडावा। प्रयत्न उदंडचि करावा ।।

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे। सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जे करील तयाचे ।।


अशा प्रकारे श्री रामदास स्वामींनीही देव-धर्म-राष्ट्रासाठी देह झिजवून परमार्थ साधावा हा युवकाना कळकळीचा संदेश दिला आहे.

kthalekhn kse krave 

काळ कोणासाठी थांबून राहत नाही. वेळ हीच संपत्ती हे न विसरता आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणे हाच युवकांचा धर्म आहे. केवळ नोकरी हे शिक्षणाचे व जीवनाचे उद्दिष्ट नाही तर सस्कारक्षम            'सु' शिक्षिततेसाठी, जीवनाच्या व राष्ट्राच्या यशस्वितेसाठी वाचन, मनन, उद्योजकता, आरोग्यसंपन्नता, समाजसेवा व स्वावलंबनत्व हे गुण टी. व्ही. - सिनेमे - फॅशनपेक्षा शतपटीने आवश्यक आहे हे लक्षात घ्यायला हवे.

हवाईदल, नौदल, लष्कर, क्रीडाक्षेत्र, कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र इत्यादी अनेक क्षेत्रापैकी एखाद्यातरी प्रांतात शक्ती-युक्ती-बुद्धीने ठसा उमटविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा युवक-युवतींनी बाळगावयास हवी. समाजानेही त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून ही प्रचंड युवाशक्ती विधायक कार्याकडे वळविली पाहिजे 'सामर्थ्य हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू! उठा धीट बना!'

babasaheb jantti prshnmanjusha 

स्वामी विवेकानंदांनाच्या या आवाहनाला साथ देऊन युवकांनी देशाचे आधारस्तंभ बनावे हाच राष्ट्रीय युवकदिनाचा उद्देश आहे.