Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

अविचारी मित्र

 

अविचारी मित्र



पंचवटी गावालगत एक भले मोठे अभयारण्य होते. त्या जंगलात अनेक प्राणी राहत होते. अभयारण्यात सर्व प्रकारची सुखे उपलब्ध होती. भरपूर पाणी, वनस्पती, मोकळी जागा व शिकाऱ्यांना बंदी. याच कारणाने जंगलात आनंदी आनंद होता. सर्व प्राणी सुखात, मजेत जीवन जगत होते. या अभयारण्यात एक क्रूरसिंग नावाचा सिंह राहत होता. त्याचीच भीती प्राण्यांना वाटत होती.

 कुरसिंग सुद्धा प्राण्यांना सतावत नसे. भूक लागे तेव्हाच तो शिकार करे. याच जंगलात नंदी, शंख व त्रिशूल नावाचे तीन बैलही राहत होते. तिघांची चांगली मैत्री होती. ते चांगलेच बलवान व चपळही होते. एकदा क्रुरसिंगाची नजर या तिघांवर पडली. वा ! मस्त मेजवानीची सोय झाली. क्रुरसिंगाच्या मनात विचार आला.

क्रुरसिंगाने एक दिवस त्यांच्यावर हल्ला केला. ते बेसावध ५० । छान छान गोष्टीहोते. सिंहाने जोरदार धडक दिल्याने नंदी खाली कोसळला. त्याच्या मित्रांनी लगेच सिंहावर आक्रमण केले. नंदी उठून उभा राहिला. सर्वांनी मिळून रसिंहाला घेरले त्यांनी सिंहावर अनेक वेळा हल्ले करून त्याला जखमी केले. नाईलाजाने रसिंगला पळून जावे लागले. तिथे मित्र पुन्हा आरामात चरू लागले. मय म्हणजे काय असते हे त्यांना माहीत नव्हते.

क्रुरसिंगाला झोपेतही ते मस्तवाल बैलच दिसत होते. त्यांना कसे मारावे व मेजवानी करावी, तो रात्रंदिवस हाच विचार करत होता. एक दिवस काही कारणावरून तिघा मित्रांमध्ये भांडण सुरु झाले. भांडण युद्धात बदलले. एकमेकांना धडका मारल्या. लांब व मजबूत शिंग मारुन ते एकमेकांना जखमी करु लागले. शेवटी त्रिशूलने मध्यस्ती करुन वाद संपवला. सर्वांची मने जुळेपर्यंत वेगवेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

क्रुरसिंगाला हे कळले. त्याला आनंद झाला. मनात म्हणाला चला संधी तर आहे. आता घेतो अपमानाचा बदला व मस्त मेजवानीचा आस्वाद. दुसऱ्या दिवसापासून नंदी, शंख व त्रिशूल एक-एकट चरू लागले. क्रुरसिंग लक्ष ठेवूनच होता. त्याने एकट्या नंदीला पाहून आक्रमण केले. त्याला रक्तबंबाळ केले. त्याच्या दोन्ही मित्रांनी हे दृश्य पाहिले. पण बरं झालं, अद्दल घडली." म्हणून शांतपणे चरत उभे राहिले. नंदीला मारून क्रुरसिंगने पहिल्या मेजवानीचा आस्वाद घेतला. नंतर पाळी आली शंखाची, पुन्हा तेच घडले त्रिशूलने मदत केली नाही. शंखाने मदतीसाठी धावा केला पण क्रुरसिंगाने आपले काम फत्ते केले. आता तर त्रिशूल एकटा पडला क्रुरसिंगाने आरामात त्याची शिकार करून आपल्या दोस्तांनाही मेजवानी दिली.क्रुरसिंग आता अशाच मुर्खाच्या शोधात आहे.

(तात्पर्य :एकतेत बळ असते. एकी हीच खरी ताकद असते.)

                                                            (sanjay magdum)

No comments:

Post a Comment

Write a comment.