'देव हा आडदांड लोकांचाच आहे'
एका गरीब व श्रद्धाळू माणसाकडे देवाची लाकडी मूर्ती होती. तो मनुष्य
त्या मूर्तीसमोर दररोज तासंतास बसून तिची पूजाअर्चा करी व आपली
परिस्थिती सुधारण्यासाठी मूर्तीची प्रार्थना करी. परंतु त्याची परिस्थिती
सुधारण्याऐवजी ती दिवसानुदिवस अधिकाधिक बिघडू लागली. अखेर
एके दिवशी रागाच्या भरात त्याने ती लाकडाची मोठी मूर्ती जमिनीवर
आदळली, त्याबरोबर आतून पोकळ असलेली ती मूर्ती फुटून, तिच्यातून
शेकडो सुवर्णमोहोरा बाहेर पडल्या. त्या पाहून तो मनुष्य म्हणाला, "देवा,
स्पष्ट बोलतो त्याबद्दल मला क्षमा कर, तू तुझी भक्तिभावे पूजाअर्चा
करणाऱ्यांचा नाहीस. तुला न जुमानणाऱ्या आडदांड व जबरदस्त अशा
माणसांचाच आहेस. त्यालाच तू पावतोस. इतके दिवस मी तुझी पूजाअर्चा
केली तेव्हा तू मला पावला नाहीस, पण आता मी तुला आपटताच तू शेकडो
सुवर्णमोहोरा मला देऊन, माझे दारिद्र्य घालवलेस."देव हा दुर्बलांचा
नव्हे, तर
प्रबलांचाच पाठीराखा असतो.
No comments:
Post a Comment
Write a comment.