Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

कष्टाचा कमाई

 

कष्टाचा कमाई

दिलेल्या शब्दावरून कथा लिहा .

शेठजी ,आळस ,पैसा ,हमाल ,कष्ट 

बदलापूर नावाचे एक गाव होते.त्या गावातील एका शेठजींचा मुलगा, रामू  खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून खूप  लाडका. श्रीमंत बापामुळे त्याला काम कधी करावे लागलेच नाही. लाडात वाढलेल्या मुलगा  त्याच्या बापालाही तो एकवीस वर्षांचा झाला,हे ही लक्षात आले नाही .दिवसामागून दिवस असेच निघून जात होते .आता मात्र शेठजींना लागली काळजी वाटू लागली . आपण साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्‍याच दिवशी‍ त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.

रामूला काय करावे  काहीच कळेना.अचानक वडील वडिलांनी असा पवित्रा का घेतला असेल असा विचारही त्याला आला नाही  त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्‍या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. रामूला ऐत खायाची सवई लागल्यामुळे परत  रामू  आईकडे गेला.आई कडून एक रुपया मागून तो शेटजींनी दिला . तोही पैसा वडिलांनी विहिरीत फेकला. रामूला काहीच कळेना वडील असे वागतात.आता तिसऱ्या दिवसीही तीच अट घातली आणि घरातील लोकांना सक्त ताकीत दिली .त्यामुळे रामू  दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.

त्या व्यक्तीस पाहताक्षणीच रामू  धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली.भुके मुळे त्याला काम करताना कोणताही कमीपणा जाणवला नाही . एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने रामूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने रामू  संतापला. त्याला वडिलांचा खूप राग आला म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्‍या कष्टाची किंमत कळली.

तात्‍पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी श्रीमंती .

marathi   bodha   ktha   

 

No comments:

Post a Comment

Write a comment.