जीवन जगण्याची कला
एक तरुण मुलगा जीवन जगत
असताना क्षणोक्षणी जीवनाचा कंटाळा करु लागला. त्याला कोणत्याच गोष्टीत रस राहिला
नाही. त्यामुळे तो गुरुदेव ज्ञान यांच्याकडे गेला. त्यांचेपुढे आपली व्यथा
मांडताना तो म्हणाला.
"गुरुजी मी या
जीवनाला खूपच कंटाळलोय जिकडे पहावे तिकडे कलह, घरी-दारी
कटकटी, भांडण, इर्षा, स्तुती, निंदा या जगात जगावे कसे तेच कळत नाही.
तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा. जीवन आनंदाने जगता येईल असा एखादा मंत्र
द्या."
गुरुदेव म्हणाले, “मुला, जोपर्यंत ईश्वराने जीवन दिले आहे. जोपर्यंत
श्वास चालू आहे. तोपर्यंत इच्छेत जगावं." गुरुदेवांच्या बोलण्याचा अर्थ त्या
तरुणाला काही कळला नाही. त्याची संभ्रमित स्थिती पाहून गुरुदेव त्याला म्हणाले.
"तू एक काम कर सकाळी
उठून नदीकाठी राजघाटावर जा आंघोळ करून तेथील मोठ्या दगडी स्तंभाची मनोमाये पूजा
करत त्याची स्तुती कर." त्या तरुणाने गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे केले.
पुन्हा गुरुदेवाकडे आला. गुरुदेव म्हणाले "झाली स्तंभाची पूजा? छान ! आता असं कर उद्या सकाळी पुन्हा स्तंभाजवळ जावून त्याची निर्भत्सना
कर. तुला येतील तेवढे अपशब्द स्तंभाला बोलत राहा."
` आश्चर्यचकित
होत गुरुदेवांनी सांगितलेप्रमाण केले आणि पुन्हा गुरुदेवाकडे आला. गुरुदेव म्हणाले,
“आता कळलं ना. तुला जीवन कसं जगावं" तरुण पूर्ण गोंधळला त्याला
काहीच कळेना.
प्रसन्न हसत गुरुदेव
म्हणाले,
"वत्सा ! ज्याप्रमाणे निंदा स्तुतीचा त्या स्तंभावर काहीही
परिणाम झाला नाही. तसे आपणही जीवन जगावे. कुणी स्तुती केली तर गर्वाने फुगू नये
आणि कुणी निंदा केली तरी घाबरुन जाऊ नये. कारण कुणाच्या स्तुतीने तुझे सत्कर्म
वाढणार नाहीत किंवा निंदेने द्वेषाने सद्गुणांचे दुर्गुणात परिवर्तन होणार नाही.
म्हणून स्वत:ला ओळखावे. भांडण, कलह, कटकटी
हे चालूच राहणार या सर्वांमुळे दुःखी-कष्टी न होता आनंदी जीवन जगावे हीच तर जीवनजगण्याची कला आहे.'
(तात्पर्य - 'निंदा स्तूतीचा
विचार न करता आनंदाने जीवन जगा.')
ليست هناك تعليقات:
إرسال تعليق
Write a comment.