Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

दुर्दैवी भिकारी

 

दुर्दैवी भिकारी   मराठी बोधकथा कथा 



                  एकदा  एक भिकारी भिक मागून मागून वैतगला होता .आता त्याला या जीवनाचा कंटाळा आला त्याने आता नामजप करून देवाला प्रसन्न करायचे ठरवले .त्याप्रमाणे तो दिवस रात्र  नामजप करू लागला .देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला काय हवे ते माग’, असे सांगितले.

भिकाऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू पुरेम्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’

भिकाऱ्याने अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोहरांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी पुरेम्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले.झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.

तात्पर्य  : कोणत्याही गोष्टीचा अती हव्यास दुर्दैवाचे कारण ठरतो .

यासारख्या बोधकथा वाचण्यासाठी – येथे क्लिक करा .

Online test सोडवण्यास  -  येथे टच करा .

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Write a comment.