अति लोभाचे फळ
एक बादलपूर नावाचे छोटेसे
गाव होते. त्या गावात एक गरीब शेतकरी होता.
त्याचा कडे कसन्यासाठी थोडीच जमीन होती. त्या जमिनीवर तो आणि त्याचे कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा
भागवत होते. कमी जमीन असल्यामुळे त्याचा फक्त प्राथमिक गरजा भगत असे. या कारणामुळे
तो नेहमी दुःखी असे. त्यास वाटे की आपल्यालाही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी.
त्यासाठी तो सारखे म्हणत असे कि, "मला भरपूर जमीन मिळाली
तरच मी सुखी होईतो नेहमी यांसाठी देवाकडे मागणी करत असे. देवाने ही एक दिवस त्यास
दर्शन द्यायचे ठरवले.
एक दिवस तो सकाळी जागा झाला, तो समोर देवाचेच दर्शन झाले. त्याला खूप आनंद झाला आता आपली इच्छा पूर्ण
होईल असे त्याला वाटले, त्याने देवाला नमस्कार करून विनंती
केली कि देवा मला भरपूर जमीन मिळवून दे. देवाने सांगितले. तू आता पळायला सुरवात कर
सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेरी मारून इथे येऊन पोचशील तेवढी जमीन
तुझी होईल असे बोलून देव अदृश्य झाले शेतकऱ्यास खूप आनंद झाला.
त्याने देवाने सांगितल्या
प्रमाणे धावण्यास सुरवात केली पण जास्त जमीन मिळवायची त्याची हाव काही सुटत नव्हती
त्यामुळे खूप दूरच्या क्षेत्राला वळसा घालत तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी
आला. पण दिवसभरात अविरत धावत राहिल्यामुळे तो एवढा दकला होता कि तिथे पोचल्याबरोबर
त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला व जागच्या जागी मरण पावला. ते पाहून देव
पुन्हा आले आणि देव म्हणाला,
“तो आता जेवढ्या जमिनीवर
पडला आहे तेवढ्याच जमिनीची त्याची वास्तविक गरज होती अस्या प्रकारे शेतकरी ला जमीन
मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने गेला. देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले
आता तुला हवीय का जमीन, तेव्हा शेतकरी बोलला मला क्षमा करा
इथून पुढे मी खूप कष्ट करेन आणि स्वतः च्या जीवावर जमीन घेईल देव प्रसत्र होऊन
अदृश्य झाला. मराठी बोधकथा
No comments:
Post a Comment
Write a comment.