धूर्त वटवाघूळ
एक वटवाघूळ एका रानमांजराच्या तावडीत सापडले. आता ते रानमांजर त्याला ठार मारणार, एवढ्यात ते वटवाघूळ त्या रानमांजराकडे दयेची याचना करू लागले. पण ते रानमांजर त्याला म्हणाले, "तावडीत सापडलेल्या कुठल्याही पक्ष्याला मी आजबर जिवंत सोडलेलं नाही." यावर ते धूर्त वटवाघूळ त्याला म्हणाले, “तर मर्गे तू मला दया दाखवणे ते जरूर आहे, कारण माझं तोंड पहा. आहे ना हुबेहूब
उंदरासारखं ? मग
उंदरासारखं तोंड असलेला मी पक्षी कसा असेन ? मी पशूच
आहे." त्याचं म्हणणं पटून, त्या रानमांजराने त्याला
जिवंत सोडून दिले.
थोड्या दिवसांनी तेच वटवाघूळ दुसऱ्या एका रानमांजराच्या तडाख्यात सापडले. ते आता त्याला ठार मारणार, एवढ्यात ते वटवाघूळ त्या रानमांजराकडे दयेची याचना करू लागले. पण ते
रानमांजर त्याला म्हणाले, "तावडीत सापडलेल्या कुठल्याही
पशूला मी आजवर कधीही जिवंत सोडलेलं नाही." यावर ते धूर्त वटवाघूळ त्या
रानमांजराला म्हणाले, "असं असेल, तर
तू मला अवश्य जिवंत जाऊ दिलं पाहिजेस, कारण माझे " पंख
पहा. आहेत ना पक्ष्यांसारखे ? मग पंख असलेला मी पशू कसा असेन
? मी पक्षीच आहे." त्याचं म्हणणं पटून, त्या रानमांजराने त्याला जिवंत सोडून दिले.
धूर्त माणसे परस्परविरोधी गटातील लोकांकडे जातात आणि
आपण तुमचेच आहोत' असे त्यांना भासवून, आपली कामे साधून घेतात.
aअभ्यासात मदतीसाठी व्हिडीओ पहा . click here
No comments:
Post a Comment
Write a comment.