Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Dream Marathi Story | स्वप्न Katha Dream

 

 Marathi Story | स्वप्न


Marathi Katha Dream-

 

जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती कोणते ना कोणते ध्येय मनाशी ठरवूनच जगत असते .काहींची ती पूर्णही होतात पण काहीना ती पूर्ण करण्यात अपयश आलेले असते त्यातील काही खचून जातात तर काहीजण आपला मार्गच बदलतात .त्याचे स्वप्न मात्र संपत नसते.असेच एकदा देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला गुलाबरावानी भेट दिली. भेटी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण दवाखाना फिरून दाखवला , तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले, ” साहेब, येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.      

 गुलाबरावानी उत्सुकतेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ” साहेब, ते सर्व वेडे खोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.यावर गुलाबरावानी बुचकळ्यात पडले ते आपल्याच विचारात मग्न दिसू लागले .

आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे    विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.पण जगाच्या वेडेपणा दाखवण्यात आपण धन्य मानत असतो .वेड्यांचे स्वप्न हे कदाचित त्यांचे अपूर्ण ध्येयही असू शकते.असा विचारही आपल्या मनात येऊ नये .

No comments:

Post a Comment

Write a comment.